SANGLI: पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...

पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि पृथ्वीराज यांचा वाढदिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणुन माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आ. डॉ. विश्वजित कदम यांनी आपण सर्वांने एकत्रित रहा म्हणजे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याच शुभहस्ते व विशाल पाटील, जयश्रीताई पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


विश्वजित कदम म्हणाले, यशोधन हे नाव का ठेवण्यात आले असे पृथ्वीराज पाटील यांना विचारण्यात आल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी या महाराष्ट्राची जडण घडण यशवंतराव चव्हाण यांनी केली. एक संपन्न आणि सुफलाम महाराष्ट्र निर्माण केला. त्यांच्या विचारांची एक शिदोरी म्हणुन "यशोधन" हे नाव देण्यात आले. तसेच यशोधन नावाचे एक सुंदर पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहले आहे. ते मला अतिशय आवडणारे पुस्तक आहे. म्हणुन यशोधन हे नाव ठेवले. पृथ्वीराज पाटील यांचा हा विचार मला आवडला, भावला आणि योग्य ही वाटला.



यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, डॉ. पतंगराव कदम, यांनी हा महाराष्ट्र विकसित केला संपन्न केला. त्यांच्या या विचारावर आपल्याला पुढे जायला हवे. आज या कार्यालयातुन जनसेवेचे एक दालन विकसित होत आहे. सर्वसामान्य आणि गरीब माणसांची सोय होत आहे. याचा मला आनंद वाटतो.  अभिमान वाटतो.  


आज दुर्देवाने विरोधकांना विधानसभेत बोलु दिले जात नाही, जनतेच्या समस्या मांडु दिल्या जात नाहीत, असे हे हुकुमशाही प्रमाणे वागणारे सरकार आहे.  माजी मंत्री जयवंतराव पाटील यांच्या सारख्या मान्यवर नेत्याला अधिवेशन काळात बंदी घालण्यात येते, ही निशेधार्ह बाब आहे, आणि म्हणुन आपण सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे, आणि ती काळाची गरज आहे.  या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करून हे संपर्क कार्यालय सर्व सामान्यांच्या कामी उपयोगी येईल असा विश्वास व्यक्त करून पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.  


या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे कार्य सुलभतेने करता यावे यासाठी या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली.  हे कार्यालय एक प्रकारचे सेवा सदन असुन सर्व सामान्यांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील.  या प्रसंगी मला माझे वडील सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांची आवर्जुन आठवण येते.  समाज कार्यांची आणि सहकारातील त्यांच्या कार्यांची सदैव स्मरण येते.  त्यांच्या स्मृतीचे रूपांतर सामाजिक कार्यात व्हावे यासाठी मी कार्यरत आहे.  या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.  माझ्या या कार्याच्या वाटचालीत सर्व कॉंग्रेसच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे मनापासुन सहकार्य मिळत गेले.  या पुढील काळातही ते मिळेल असा विश्वास व्यक्त करून आपणा सर्वांचे मनापासुन आभार मानतो.

यावेळी आ. विक्रम सावंत, आ. जयंत आसगावकर, जितेश कदम, संजय मेंढे, पद्माकर जगदाळे, किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, शेखर माने, सिकंदर जमादार, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, रविंद्र वळवडे, रवि खराडे, सनी धोतरे आदि अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.