संभाजी पुरीगोसावी लोकसंदेश प्रतिनिधी कोल्हापूर.
*कोल्हापूर परिक्षेत्र नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्वीकारला पदभार...
फुलारी यांच्या नियुक्तीने सांगलीतील कारकीर्दीच्या आठवणीला पुन्हा उजाळा...!
कोल्हापूर परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्रांचे माजी कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोजकुमार लोहिया यांच्याकडून स्वीकारला पदभार. तर डॉ.मनोजकुमार लोहिया यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तलयांत सहआयुक्त पदी नियुक्ती करण्यांत आली. शनिवारी दुपारी उशिरा राज्य सरकारकडून पुन्हा बदल्यांमध्ये काही बदल करुन नव्यांने यादी जाहीर केल्यानंतर सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. सुनील फुलारी यांनी सोमवारी सायंकाळी आपला पदभार स्वीकारला. तर मनोजकुमार लोहिया यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतील पोलीस ठाण्याच्या सक्षमीकरण करण्यासाठी चांगलाच भर दिला होता. सांगली येथील भोंदू बाबांनी केलेल्या खून प्रकरणातील उकल लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तर कोल्हापूर परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या नियुक्तीमुळे सांगलीतील कारकीर्दीच्या आठवणीने पुन्हा उजाळा मिळाला. त्यांनी यापूर्वी नागपूर मुंबई सांगली नाशिक पुणे आदी ठिकाणी सेवा बजावली. त्यांच्याच प्रयत्नातून राज्यातील पहिली सायबर क्राईम प्रयोगशाळा सुरु झाली होती. सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरीही त्यांनी चांगलीच बजावली होती. संघटित गुन्हेगारीसह काळया धंदेवाल्यांविरोधात त्यांनी उघडलेली मोहीम धडकी भरणारी होती. आता ते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यांतील त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा उजाळा मिळाला. त्यांनी आज सायंकाळी चार वाजता माझी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार कुमार लोहिया यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर मनोजकुमार लोहिया यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तलयांत सहआयुक्त या पदावर त्यांची बदली करण्यात आली. सुनील फुलारी हे शिस्तप्रिय शांत अधिकारी असल्यांचे बोलले जात आहे. मूळचे ते नागपूर जिल्ह्यातील आहेत. सुनील फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिल्यांमुळे त्यांना कोल्हापूर परिक्षेत्रातील चांगलीच माहिती आहे. सुनील फुलारी हे आपल्या दालनात हजर होताच माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोजकुमार लोहिया यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला.*
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________