झालं इलेक्शन.. जपा रिलेशन......
ग्रामपंचायत निवडणूका संपन्न झाल्या, काहींचा दणदणीत विजय होईल काहींचा दारुण पराभव होईल तर कोणी काटावर निवडून येईल तर कोणी थोडक्यात अपयशी ठरेल, काहींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली यात काही यशस्वी होतील तर काही अपयशी.गावकीच राजकारण फार बेकार असते.
सत्तेचा सारीपाट हा गेली एक महिन्यापासून आपण आप आपल्या गावात अनुभवला, निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे, आलेल्या सणाचा ही उपयोग करून घेणे,प्रचार प्रभावी कसा होईल यासाठी वाटेल ते करणे यामुळे नकळत आपलेच आपल्या विरोधात गेले, कोण हा वार्डात तर कोण विरोधी वार्डात घरातली, रक्ताची नाती प्रतिस्पर्धी बनली, एकमेकांचे उणेंदुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे हे पटवून देण्यात आले.
उमेदवारांनी दिवसाची रात्र केली, ढाबे, पाय रंगल्या, विकासकामांचे जाहिरनामे, विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालीवरती बसवलेली टेक्नॉलॉजी च पुरेपूर फायदा घेत प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.
गुलाल कुणाचाही असो सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत, आपलीच आहेत, कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो, शांत रहा संयमी रहा, मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे, आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनच झालं इलेक्शन आता जपा रिलेशन हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती प्रत्येक गावात जपली पाहिजे.
झालं Election.....जपा Relation....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________