SATARA : मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त.....




https://youtu.be/6irfctDC-_w

SATARA
वाई प्रतिनिधी -ओंकार पोतदार

मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त.....

https://youtu.be/6irfctDC-_w

वाई मध्ये आठवडे बाजारात हल्ली चोरीचे सत्र वाढले आहे. या बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, गर्दीचा फायदा घेवून चोरटे बाजारसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला मारत आहे.


एकीकडे चोरट्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे मात्र पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजारसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. वाई बाजार ज्यावठिकाणी भरतो त्या ठिकाणापासून वाई मधील पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे.


दरम्यान हे चोरटे मोबाईल अथवा खिसा मारतात व मागच्या व्यक्तीकडे मुद्देमाल द्यायचा अशाप्रकारे बाजारात नागरिकांचे मोबाईल व पैशांची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. प्रत्येक सोमवारी नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला जात असल्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.पोलिसांचे झंझट मागे नको म्हणून नागरिक तक्रार करण्याकडे काना डोळा करत असून मोबाईल चोरीमुळे बाजारासाठी येणारे नागरिक वैतागले आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_________________________________________________





_________________________________________________