SANGLI: भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतले वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतले वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतले स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन......


सांगली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली दौऱ्यात 13 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कृष्णाकाठावरील समाधीस्थळी दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली व अभिवादन केले.



बावनकुळे हे मागील तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होता.

13 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची 105 वी जयंती असल्यामुळे बावनकुळे व त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे आमदार कामगारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगलीच्या कृष्णा काठावरील समाधीचे दर्शन घेऊन वसंतदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई, सांगली