SANGLI जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीकरीता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीकरीता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर



SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीकरीता
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

सांगली, दि. 11 : पलूस तालुक्यातील कुंडल, मिरज तालुक्यातील नांद्रे व हरिपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव आणि आटपाडी तालुक्यातील चिंचाळे ग्रामपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.


सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 19 दि. 1 फेब्रुवारी 2022 अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 10(क) मध्ये सुधारणा करण्यात आली असून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाच्या जागा पंचायतीमधील निवडणुकीव्दारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या 27 टक्क्यापर्यंत असतील आणि एकूण आरक्षण, पंचायतीमधील एकूण जागांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा जागा पंचायतीमधील वेगवेगळ्या प्रभागाला आळीपाळीने नेमून देण्यात येतील असे अधिसूचित केले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील या पाच ग्रामपंचायतीसाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्केनुसार निश्चित करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने दि. 9 नोव्हेंबर रोजी दिलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमातून या पाच ग्रामपंचायती आयोगाने वगळल्या आहेत.


आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. विशेष ग्रामसभेची सूचना देणे (आरक्षणाची सोडत काढण्याकरीता) - दि. 15 नोव्हेंबर 2022. विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) - 17 नोव्हेंबर 2022. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे - दि. 18 नोव्हेंबर 2022. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी - 18 ते 22 नोव्हेंबर 2022. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे - 23 नोव्हेंबर 2022. उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे - दि. 24 नोव्हेंबर 2022 आणि जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देणे - दि. 25 नोव्हेंबर 2022.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD.

MUMBAI.


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन  सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

पत्ता : महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी,महाराष्ट्र स्क्रॅप,शंभर फुटी रोड ,नूरानी मशिदी जवळ,सांगली.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________