SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे कवठेमहांकाळ शहरातली जनता आठ दिवसातच समाधानी ..... - : नगराध्यक्ष; शुभांगी गावडे
- गेल्या काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने भरघोस यश संपादन करून यांनी परिवर्तन घडवले. आठ दिवसातच खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून कवठेमंकाळ शहरासाठी 60 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली आहे.
आज केंद्र शासन पुरस्कृत 'अमृत २.० अभियान' अंतर्गत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाच्या वतीने प्रशासकीय मंजुरी देवून सुमारे रु. ६० कोटी १० लक्ष इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आलेबाबतचे शासन निर्णय प्रसिद्ध झालेची माहिती नगराध्यक्ष शुभांगी गावडे यांचेकडून देण्यात आली.
कवठेमहांकाळ नगरपंचायत येथे भाजपची सत्ता स्थापन झालेनंतर नूतन नगराध्यक्षा सौ. शुभांगी गावडे आणि नगरसेवक यांनी खासदार संजयकाका पाटील यांचेकडे शहरासाठी खूप दिवसांपासून प्रलंबित असणारी पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणेसंदर्भात कवठेमहांकाळ बंडगरवाडी पाणी पुरवठा योजना मंजूर करणेबाबत आग्रही मागणी केली होती. त्यानंतर लगेचच खासदार संजयकाका पाटील यांनी यासंदर्भात शासनस्तरावर राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मोठा निधी मंजूर करुन आणलेबद्दल कवठेमहांकाळ येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत या अमृत २.० अभियान या प्रकल्पातून कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचेकडे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा केला व त्याचेच यश म्हणून नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी शासन निर्णय प्रसिद्ध केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील हेही उपस्थित होते.
या मंजूर प्रकल्पाच्या भरीव निधीमुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतमधील पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास येणेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ शहरासाठी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद केल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब व उपसचिव श्रीकांत आंडगे यांची भेट घेवून आभार व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________