RAYGAD
लोकसंदेश प्रतिनिधी शाम लोखंडे.
जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसींचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्या ,
ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर,माजी आ.दशरथदादा पाटील, जे.डी. तांडेल यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी टिकले पाहीजेत हे आरक्षण टिकले तरच भविष्यात ओबीसींच्या शहरासह ग्रामीण भागातील तरुणांना शैक्षणिक व नोकरीसह अन्य ठिकाणी लाभ होईल. ओबीसींची निश्चीत माहीती मिळावी यासाठी शासनाकडे ओबीसी समाजाची महत्त्वपुर्ण मागणी असेलेल्या जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज १८ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.
ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील सर्व पक्षीय ओबीसी संघटना एकत्रित येत जनमोर्चा काढण्यात आले होते याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे,आ.अनिकेत तटकरे,आ.अदिती तटकरे,माजी आ.पंडितशेठ पाटील,धैर्यशील पाटील,जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे,चंद्रकांत बावकर,जे डी तांडेल, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर सह आदी जिल्हयातील सर्व ओबीसी पदाधिकारी व ओबीसी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.तर आपल्या जातीनिहाय न्यायहक्कांसाठी येथील जिल्हाधिकारी यांना याबतचे निवेदन देण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
____________________________________________
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________