KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
आर्थिक फसवणूक प्रकरणी ग्रोबझच्या कोळीला अटक
गुंतवणुकीवर १५ टक्केने परतावा देतो, असे सांगून लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून विश्वास निवृत्ती कोळी (वय ४५, रा. बावची, ता. वाळवा, जि. सांगली) यास सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले उज्ज्वला शिवाजी कोळी, स्वप्निल शिवाजी कोळी (दोघे रा. यशोधा विश्वास कॉलनी, मस्जीदजवळ लक्षतीर्थ वसाहत), सौरभ कोळी (दोघे रा. बावची, ता. वाळवा), व सोमनाथ कोळी यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपींनी ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी सुरू केली होती. शाहूपुरी चौथ्या गल्लीतील स्वस्तिक हाउस येथे त्यांनी कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूक केल्यास १० महिन्यांमध्ये १५ टक्के परतावा देण्याचे आमिष त्यांनी रघुनाथ शंकर खोडके (वय ३२, रा. हारपवडे, ता. पन्हाळा) यांना दाखवले. मात्र, ठरलेला परतावा त्यांना मिळाला नाही. ४१ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खोडके यांनी तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली
ही कारवाई म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.. या कंपनीकडे कितीतरी पटीने लोकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी आता सामोरे येण्याचे पोलिसांनी आवाहन केलेल आहे
कोल्हापूर व आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे ह्या गोरगरीब गुंतवणूकदारांच्या पैशाचं काय ?? असा प्रश्न आता गुंतवणूकदार करीत आहेत...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली