SANGLI
लोकसंदेश जत प्रतिनिधी
पाच्छापुरात मारुती देवकर थेट सरपंच पदासाठी लढणार.
पाच्छापूर गावचे शिवसेना गुंठेवारी विकास समिती सांगली जिल्हा अध्यक्ष मारुती देवकर हे पाच्छापूर ग्रामपंचायतची थेट सरपंच पदासाठीची निवडणूक लढविणार आहेत. सामाजिक कार्यात सहभाग असणारे अत्यंत कमी वेळात जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेले मारुती देवकर यावेळी थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढविणार असून सोबत 9 सदस्य ही रिंगणात उतरवणार आहेत.
त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. कायम जनहितासाठी धडपडणारा आपला माणूस म्हणून देवकर यांना ओळखले जाते ते अल्पावधीत मातोश्रीला भेट देणारा जिल्हाध्यक्ष ठरलेले आहेत. आजपर्यंत ते सतत कोणताही भेद न मानता सामाजिक कामात अग्रक्रमाने पुढाकार घेतात गुंठेवारी विषयी ते अत्यंत टोकाची भूमिका गुंठेवारी धारकांसाठी घेतलेले आहेत. गुंठेवारीच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी ते अग्रस्थानी आहेत. शेतकरी संघटना नाभिक संघटना आणि गुंठेवारी च्या माध्यमातून ते अत्यंत प्रभावीपणे आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे . गावात रासपा घटक पक्ष मित्र पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असे मत मारुती देवकर यांनी व्यक्त केलेले आहे .
पाच्छापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानात
पाच्छापूर गावातील स्थिती बिकट असून पाण्याची व्यवस्था गटारीची व्यवस्था लाईट रस्ते या प्रश्नासंबंधी नागरिकांचे हाल होत आहेत हे प्रश्न कायमस्वरूपी व गावाचा नावलौकिक मिळवण्यासाठी मतदारांनी संधी द्यावी . नुसते हिवरेबाजार आणि पाटोदा गाव यासारखे गाव करणारा अशी घोषणा करणार नाही तर गावचा विकास करून गावाला हिवरे बाजार पाटोदाचे प्रतिरूप बनविण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत असे प्रतिपादन
थेट सरपंच पदाचे उमेदवार मारुती देवकर यांनी केले आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली