SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
'पेठ-सांगली' नंतर जरा मिरजेतील रस्त्यांकडे लक्ष द्या...
बाळासाहेब होनमोरे यांची पालकमंत्र्यांवर टीका
पेठ ते सांगली रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याची निविदा काढल्याचे ढोल पालकमंत्री सुरेश खाडे वाजवत आहेत. पालकमंत्री एवढे पॉवरफुल्ल असतील तर त्यांनी आधी मिरज शहरातील मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था सुधारावी. खड्यांनी, धुळीने भरलेले मिरजेतील रस्ते खाडे यांना गेल्या १३ वर्षांत सुधारता आले नाहीत. दिसत नाहीत,मिरजेतील खराब रस्ते त्यांचेच पाप असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे खाडे यांनी जाहीर केले होते. ते १०० कोटी कुठे गेले? शहरातून जाणाऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागे का पडले? याचे उत्तर गेली तेरा वर्षे आमदार असणाऱ्या पालकमंत्री खाडे यांनी द्यावे, अशी मागणी होनमोरे यांनी केली आहे.
ते तेरा वर्षे आमदार आता पालकमंत्री आहेत. विकास करायला एवढा काळ पुरेसा आहे. या काळात मिरज शहरात नेमका काय विकास झाला, हे दाखवण्यासाठी त्यांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. पेठ ते सांगली रस्ता होणार असेल तर स्वागतच आहे. मात्र, मिरज व शहराच्या वाट्याला वेदना का आहेत? या शहरातील रस्त्यांना निधी कुठे गेला असा सवाल ही
बाळासाहेब होनमोरे यानी केला आहे
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे खाडे यांनी जाहीर केले होते. ते १०० कोटी कुठे गेले? शहरातून जाणाऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागे का पडले? मिरजेमध्ये या 13 वर्षात काय प्रगती झाली? याचे उत्तर गेली तेरा वर्षे आमदार असणाऱ्या व आता मिरजेचे पालकमंत्री खाडे यांनी द्यावे, अशी मागणी बाळासाहेब होनमोरे यांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
पत्ता : महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी,महाराष्ट्र स्क्रॅप,शंभर फुटी रोड ,नूरानी मशिदी जवळ,सांगली.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________