SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमातर्गत व मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडणान्या दसरा मेळावा आढावा बैठक मा. ना. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०३/१०/२०२२ रोजी सांगली सर्किट हाऊस येथे पार पडली.
यावेळी बोलताना मा. दिपकभाई केसरकर यांनी सर्व शिवसैनिकांना पूर्ण ताकदीने दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यास सांगितले.
यावेळी त्यांनी हे आपले सरकार, सर्वसामान्यांचे सरकार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान गेल्या दोन महिन्यामागे शिवतीर्थ सांगली ते मातोश्री भर पावसात जिवाची पर्वा न करता आपल्या पायाला असंख्य जखमा होवून देखील ४५० किलोमीटर पायपीट करत जाणारा अजय कलगोंडा पाटील याची विचारपूस करत कौतुकाची पाठीवर एक थाप सुद्धा मारता आली नाही. स्थानिकांना त्याच्या निष्ठेला दाद देता आली नाही म्हणून त्याने आज माझ्या हस्ते मा. एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली व प्रवेश केला.
यांच्याप्रमाणेच मिरजेचे किरणसिंग रजपूत, किरण कांबळे, समीर लालबेग, सचिन अलकुंडे, अमोल कवाडगे, महेश नरुटे, कवठेमहांकाळ येथून एकनाथ पवार, सागर शेजाळ, विजय पांढरे, जतमधून प्रकाश बंडगर यांनीही प्रवेश केला. यांच्यासह एकूण ३५ जणांनी प्रवेश केला.
सदर कार्यक्रमास माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवारे, तसेच सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, महेंद्रभाऊ चंडाळे, उपजिल्हा प्रमुख नंदकिशोर निळकंठ, माधव गाडगीळ, अविनाश पाटील, तमण्णा कुलाळ, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, साहेबराव पाटील, प्रदीप कदम, प्रशांत लेंगरे, अंकुश होवाळे, प्रदीप जोशी, सतीश निकम, श्रीकांत चव्हाण, महादेव सातपुते, शहरप्रमुख संदीप ताटे, अमोल पाटील, विजय शिंदे, राजेंद्र पवार, संजय चव्हाण, ऋषिकेश सोनवणे, निलेश आवटी, राकेश आटूगडे, शकील सय्यद, महिला आघाडी- रुक्मीणी आंबी, अॅड. प्रविणा हेटकाळे, यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली
____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________