SANGLI:
लोकसंदेश न्यूज नेटवर्क.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा : जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्रात नोंदणी करून नवउद्योजकांनी उपस्थित रहावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 07, : महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत स्थानिक उद्योजकांची व्याख्याने तसेच सादरीकरण सत्र मुल्यमापन चे आयोजन दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 या वेळेत आरआयटी कॉलेज, साखराळे, इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्या नव उद्योजकांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर दि. 14 ऑक्टोबर 2022 सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी करून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
राज्यात नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत "महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८" जाहीर करण्यांत आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनम्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रॅंडचॅलेंज, स्टार्टअप वॉक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा - जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सांगली जिल्ह्यात होणार आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक 25 हजार रूपये, द्वितीय 15 हजार रूपये व तृतीय पारितोषिक 10 हजार रूपये आहे. सर्व जिल्ह्यातील सादरीकरण सत्रानंतर एकदिवसीय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे मुख्य टप्पे प्रास्ताविक व विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती, स्थानिक Start-up / उद्योजकांची व्याख्याने, स्टार्टअप व नवउद्योजकता कार्यशाळेचे विषय (Workshop), सादरीकरण सत्र व मूल्यांकन व जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा असे आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत.
मेक इन इंडिया व स्टार्ट अप इंडियाची पुरस्कर्ते कंपनी
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________