SANGLI रामानंदनगर येथे आनंदाचा शिधा दीवाळी कीटचे वाटप..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI रामानंदनगर येथे आनंदाचा शिधा दीवाळी कीटचे वाटप..




SANGLI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क


रामानंदनगर येथे आनंदाचा शिधा दीवाळी कीटचे वाटप..

आज रामानंदनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा दीवाळी कीट ज्यामध्ये रवा,साखर,हरभरा डाळ व तेल या चार वस्तू सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा निर्णय करण्यात आला त्याची अंमलबजावणी आज रामानंदनगर शहरां मध्ये करण्यात आली.एकता चौक येथील स्वस्त धान्य दुकानातून सदर आनंदाच्या शिधा वाटपाचा प्रारंभ करण्यात आला


 त्याप्रसंगी भारतीय जनता उद्योग आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा.आमिर(भैय्या) पठाण,रामानंदनगर गावचे उपसरपंच मा.इम्रान पठाण,सामाजिक कार्यकर्त्ये मा.विलास झेंडे,ज्येष्ठ पत्रकार मा.विश्वनाथ लोखंडे,ग्रां.पं.सदस्या आशाताई गायकवाड,मा.भास्कर पवार,सौ.सरीता कुंभार,घाडगे दादा,पोपट सितापे,मा.बाळु मामा माळी,स्वस्त धान्य दुकानदार पौपट औटे सोबत परिसरातील नागरिक उपस्थित होते.त्याप्रसंगी आमिर भैय्या पठाण म्हणाले की शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन शंभर ते एकशे वीस दिवस झाले व सरकारने सर्व सामान्य नागरिकांना व शेतकऱ्यां करीता अनेक चांगले व हीताचे निर्णय आतापर्यंत घेतले आहेत दोनच दिवसांपूर्वी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देखील जमा केले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हफ्ता देखील अगोदर जमा केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अतिशय चांगले व धाडसी निर्णय घेत शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मदतीचा हात पुढे करत योग्य प्रकारे शासन चालवत आहेत रामानंदनगर शहरासाठी भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष मा.पृथ्विराज बाबा देशमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.संग्रामसिंह भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे करण्यासाठी व विविध समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहु, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहु.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली