लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रम उत्साहात साजरा
सांगली, दि. 2, : युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार आज जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमाचे आयोजन सांगली शहरात करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महानगरपालिका उपायुक्त चंद्रकांत आडके, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, क्रीडा अधिकारी एल. जी. पवार, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, आरती हळींगळी, सीमा पाटील, जमीर आतार, तसेच महानगरपालिका क्रीडा अधिकारी महेश पाटील, सचिन सावगावे सर्व प्रशासकीय खेळाडू उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त खेळाडूंनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच सर्व उपस्थित खेळाडूंना दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 अखेर सर्वांनी फिट इंडिया फ्रीडम च्या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी. स्वतःच्या तब्येतीसाठी दररोज सकाळ सायंकाळ किंवा वेळ मिळेल त्यावेळेला चालणे किंवा धावणे याचा सराव करून मोबाईल ॲप वरून किंवा स्मार्ट वॉच वरून धावलेले किंवा चाललेले अंतर रेकॉर्ड करून फिट इंडियाच्या वेबसाईटवर अपलोड करावे. फिट इंडिया फ्रीडम रनमार्फत सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच plog run अंतर्गत सर्वांनी धावताना किंवा चालताना रस्त्यावर दिसणारा हाताला येईल अशा पद्धतीचा कचरा उचलून कचरा पेटी मध्ये टाकावा, असे आवाहन केले.
फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये जिल्हा क्रीडा संकुलावर सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शकाच्या प्रशिक्षण केंद्रावरील सर्व खेळाडूंनी भाग घेतला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________