SANGLI
लोकसंदेश स्पेशल रिपोर्ट
सत्ता राष्ट्रवादीची... पाठिंबा काँग्रेसचा.. महापालिकेत कारभार मात्र भाजपचा....
सांगलीच एक वेळा वाटोळ झालं की... "झोला लेके परत आम्ही आमच्या गावी चाललो..."
सांगली मिरज कुपवाड महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचा असला तरी सध्या कारभार मात्र भाजपच्या सल्ल्याने सुरू आहे. राज्यातील सत्ताबदलाचा हा परिणाम मानला जात असला खुद्द महापौर दिग्विजय सूर्यवंशी पक्षात एकाकी पडले आहेत. सहकारी पक्ष काँग्रेसने त्यांची साथ कधीचीच सोडली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही त्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे महापौरांना भाजपचा आधार घेऊन पालिकेचा कारभार करण्याची वेळ आली आहे.
गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे आली. बहुमत असलेल्या भाजपला महापालिकेचा कारभारात स्वपक्षातील नेत्यांनी आव्हाने निर्माण केली. त्यातच पारदर्शी कारभारासाठी कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. पदाच्या पालख्या या कोअर कमिटीच्या नातलगाकडेच देण्यात आल्या. त्यामुळे अडीच वर्षांत भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली. त्यात राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने त्याचा पुरेपूर फायदा राष्ट्रवादीने उचलला. सव्वा वर्षांपूर्वी भाजपमधील २० ते २२ नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत जातील, अशी स्थिती निर्माण झाली होती. महापौर, उपमहापौर निवडीवेळी सात जण फुटले आणि बहुमतातील सत्तेच्या जवळपास गेलेल्या भाजपवर
विरोधात बसण्याची वेळ आली. काँग्रेसची सदस्यसंख्या जादा असतानाही काँग्रेसच्या नेत्यामुळे काँग्रेसवासीयांच नगरसेवकांचे काही एक चालत नसल्याने
राजकीय दबावतंत्रांचा वापर करीत राष्ट्रवादीने महापौरपद खेचून आणले.
त्यानंतर सव्वा वर्षे महापालिकेच्या पटलावर राष्ट्रवादीचा दबदबा होता. शहर जिल्हाध्यक्षांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पालिकेत उठबस वाढली होती. प्रशासनावर त्यांचा वरचष्मा होता. पण राज्यात सत्ताबदल झाला अन् हळूहळू चक्रे फिरायला लागली ...आयुक्त बदलापासून याची सुरुवात झाली आणि महापालिकेतील राजकीय चित्रही बदलले.
महापौरांच्या मागे सातत्याने असलेली राष्ट्रवादी नगरसेवकांची फळी बाजूला झाली. सभागृहात महापौरांना घेरले जात असताना ना राष्ट्रवादीचे सदस्य मदतीला येत होते, ना काँग्रेसचे... सत्ताबदलामुळे भाजपलाही नवसंजीवनी मिळाल्याने त्यांचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. स्वपक्षात एकाकी पडलेल्या महापौरांनी कारभाराची दिशाच बदलत आता भाजप नेत्यांचा सल्ला घेण्या वाचून आता आता आपल्या हातात काहीही राहिले नसल्याचे जाणून घेतले आहे
भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांच्याशी जुळवून घेणे हेच आजच्या घडीला योग्य असल्याचे महापौरांनी मानले आहे.... महासभेत भाजपचा सल्ला घेऊन निर्णय होत आहेत.
गोपीचंद पडळकर म्हणतात तसं.... कदाचित जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही... त्यामुळे महापौरांनी भाजपशी जुळून घेतल्याचे दिसून येत आहे... "उगाच पाण्यात राहून माशाशी कशाला वैर घ्यायच" असा कयास महापौरांनी लावलेला दिसत आहे...
त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणखीन दुखावले आहेत.
महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच महापौरांवर हल्लाबोल केला, तर काँग्रेसच्या मनोज सरगर यांनी महापौरांचा राजीनामा मागितला. नगरसचिवांवर राष्ट्रवादीचे नगरसेवक टीकाटिप्पणी करीत असताना महापौरांच्या मदतीला भाजपचे नगरसेवक धावून आले. महापौर राष्ट्रवादीचा असला तरी सत्तेची दोरी भाजपच्या हाती असल्याचे चित्र आहे.
एक किस्सा असा आहे...
काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महासभेत एका विषयावर ठराव करून हवा होता. त्याने महापौरांशी चर्चा केली. त्यांना विषय समजून सांगितला. पण महापौरांनी त्याला शेखर इनामदार यांना भेटण्याचा सल्ला दिला. तो नगरसेवक इनामदार यांच्याकडे गेला. त्याने विषय सांगताच इतर भाजपच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला. भाजपचा विरोध असल्याचे पाहून महापौरांनी त्या नगरसेवकाला दूरच ठेवणे पसंत केले. यावरून महापालिकेत पुन्हा भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे
"आम्ही परत येऊ "अशी भाजपची परिस्थिती आज मीतिला दिसते आहे....असो... राजकारणात कोण कोणाचा मित्र . ..कोण कोणाचा शत्रू नसतो.... त्यामुळे भवीष्यात काय होणार आहे... याचा अंदाज आज तरी लागत नाही ... सांगलीकरांनी फक्त उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहण्याशिवाय शिवाय दुसर आपल्या हातात काही नाही....
थोडक्यात काय...
या राजकारणामध्ये आणि सत्तेच्या खेळामध्ये सांगलीकरांचा मात्र फुटबॉल झाल्याच दिसून येत आहे.... कोणाचा पायपुस कोणाकडे राहिलेला नाही .....कोणाच्या घरावर ..कोणाचा झेंडा लागणार याचं काय कळत नाही.... महापौर कोणाच्या गाडीत बसणार आहेत..... नगरसेवक कुठल्या वाटेने चाललेले आहेत....काँग्रेसला तर खिसगणितच धरत नाहीत ... काही काँग्रेसचे नगरसेवक देखील भाजपच्या गळ्याला लागणार असल्याचे समजून येत आहे... आणि फक्त हे काँग्रेसच्या नेत्यांच्यामुळे होत असल्याचे एका काँग्रेसच्या नगरसेवकांनी खाजगीत सांगितले...अशा प्रकारे बरेच.खेळ सांगलीत सुरू आहेत ..
सांगली महापालिकेत येत्या निवडणुकीमध्ये याचे उत्तर जनताच आपणास देणार आहे ...
आजपर्यंत सांगलीचा इतिहास आहे... सांगली शहरातीलच नेते असतील तर... सांगलीचा विकास झालेला आहे.... परंतु सांगली बाहेरचे कोणी ही असो... मग तो कोणत्याही पक्षाचा असो ..त्यांनी सांगली शहराच वाटोळच केलेलं आहे .... एखादं कोणतं भरीव काम या नेत्यांच्याकडून झालेल आहे... असा प्रश्न आता सांगलीकर विचारत आहेत.....
सांगली महापालिका करण्याची गरज नसताना केलेली महापालिका....साधा इस्लामपूर -सांगली रस्त्याचा विषय असो.... सांगलीतील खड्ड्यांचा विषय असो.... किंवा सांगलीच्या प्रगतीच असो... किंवा सांगलीतील पिण्याच्या पाण्यासाठी पन्नास वर्षाच्या अगोदर बांधलेल्या कृष्णा नदीवरील बांधारा पाडण्याचा विषय असो.... एका महान नेत्याने सांगलीच्या बांधारा मुळे पूर येतो. . असा एक जावई शोध लावलेला आहे ... पण त्याला पाटबंधारे खाते खतपाणी घालतय ... बांधणाऱ्यामुळे सांगलीकरांना. . सांगलीतील शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी का मिळावं?? असा संकुचित विचार करून हा बांधारा पाडण्याचं नियोजन केल्याचं नागरिकांतून बोललं जात आहे
आमच्या गावामध्ये पाण्याची दैना असताना ....
सांगलीकरांना 24 तास पाणी का मिळावं?? असा एक विषय घेऊन हा बांधारा त्यांच्या डोळ्यात खूपच आहे ...
एक वेळा सांगलीच वाटोळ केलं की ,आपण परत "झोली लेके निकल जायेंगे" अशातला काही प्रकार सांगलीमध्ये घडणार आहे. परंतु इथल्या सामान्य नागरिकांना व नगरसेवकांना हे ज्ञातच नसावं ...का तर...
येथील उद्योग धंदे, मार्केट यार्ड, बँका, एमआयडीसी, साखर कारखाने कसे बंद पडतील, याच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या व सांगलीकरांच्या जीवावर उठलेल्या या राजकारणी नेत्यांना आपण आपले नेते कसं म्हणायचं.... एक वेळा सांगली बरबाद झाली की, परत "झोला लेके परत आपल्या आपल्या गावी जाणार आहेत" परंतु सांगलीचा वाटोळ करून.....
जनतेने कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा विचार न करता. .... सांगलीचा विचार करून येत्या निवडणुकीमध्ये उत्तर दिले तर सांगलीच काहीतरी कल्याण होणार आहे ...नाहीतर सांगली एक खेडेगावच राहणार आहे... कृपया याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी...
सलीम नदाफ, संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली.
8830247886