SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी
मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
सांगली, दि. 06, : राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 ऑक्टोबर 2022 असून हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2022 आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरूवार, दि. 13 ऑक्टोबर 2022, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरूवार दि. 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्वीकारण्यात याव्यात), प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्याची तारीख शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर 2022 आहे.
सांगली जिल्ह्यातील माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची एकूण संख्या 452 असून तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे. मिरज -38, तासगाव - 26, कवठेमहांकाळ - 29, जत - 81, खानापूर - 45, आटपाडी - 26, पलूस - 16, कडेगाव - 43, वाळवा - 88, शिराळा - 60.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________