RATNAGIRI: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RATNAGIRI: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा*



RATNAGIRI:

लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा

*राजापूर तालुका भाजपाचे राजापूर पोलिसांना निवेदन*



राजापूर : केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांच्या विषयी शिवीगाळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजापूर तालुका भारतीय जनता पाटीर्च्या वतीने करण्यात आली आहे.


तसे निवेदन बुधवारी राजापूर तालुका भाजपाच्या वतीने तालुका उपाध्यक्ष दिपक बेंद्रे यांनी राजापूर पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.


          मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात ठाकरे गटाने मोचार् काढला होता. या मोचार्च्या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी व्यासपीठावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी शिवीगाळ करत अत्यंत खालच्या दजार्ची आक्षेपार्ह्य विधाने करत बदनामी केल्याचे नमूद करून संबधीतावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


          राणे यांच्याविषयी भास्कर जाधव यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यामुळे भाजपा कार्यकत्यार्तून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. नारायण राणे याची बदनामी करणाऱ्या भास्कर जाधव यांच्या विरोधात भादवी कलम 499, 500, 501,504 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.     

  

          याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, भाजपा युवा मोचार् सरचिटणीस अरविंद लांजेकर, आशिष मालवणकर, अभिजीत कांबळे, शेखर आयनारकर, प्रशांत मोंडकर, संतोष धुरत, शरद घरकर, प्रसाद पळसुलेदेसाई, समीर खानविलकर आदी उपस्थित होते.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली



______________________________________________________


             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...


महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 

 कंपनी. सांगली. 

संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 


                   9850516355

            www.caroldpart.com

                  __________________________________________________________________