RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, फिनोलेक्स, जिंदाल आदी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून, आत्मा, राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत शेतक-यांना तूर, मुग, कुळिथ आदी पिकांच्या बियाण्यांचे करण्यात येणार मोफत वितरण_
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेती करिता बियाण्यांचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे रब्बी शेतीचे क्षेत्र 9000 हेक्टर एवढे आहे. ते 17000 हेक्टर एवढी क्षेत्रवाढ करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.
ज्या ठिकाणी नदी, नाले, विहिरी, धरणे, कालवे यांच्या शेजारी शेत जमीन आहे अशा ठिकाणी शेती करिता शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येता येणार आहे.
यामध्ये तुर, चवळी, मूग, कुळीथआदी कडधान्य सहित पालेभाज्या यांचे देखील बियाणे मोफत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. शासकीय योजनांमधून त्याचप्रमाणे फिनोलेक्स, जिंदाल आदी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या पगारातून काही टक्के वाटा काढून जमलेल्या पैशांमधून बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच आत्मा अंतर्गत देखील बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
गळीत धान्य योजनेअंतर्गत भुईमुग शेतीकरिता देखील बियाणे वाटप करण्यात येणार आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन केलेल्या बियाण्याचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. सदरची माहीती विभागीय कृषी अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________