MUMBAI
लोकसंदेश प्रतिनिधी
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. .हुर्रे..! विद्यार्थ्यांना 'इतके' दिवस राहणार दिवाळीच्या सुट्ट्या...
शालेय विद्यार्थ्यांसाठी Good News आहे. शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्यामुळे मुलांना दिवाळीत धमाल-मस्ती करता येणार आहे .
शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या सुट्ट्यांचे सविस्तर वेळापत्रक..
प्रथम सत्र..
विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 20 ऑक्टोबरला संपेल, तर दिवाळीला सुरुवात 21 ऑक्टोबर वसुबारसेपासून होणार आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या आहेत. तसेच, 6 नोव्हेंबरला रविवार असल्याने, 7 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु होतील.
माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या राहणार असून 13 नोव्हेंबरला रविवार असल्याने 14 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. या वेळापत्रकानुसार माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवस जादा सुट्टी मिळणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.
________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकणामध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या...
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________