KOLHAPUR: सायबर जगतातील आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे:आशुतोष कापसे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: सायबर जगतातील आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे:आशुतोष कापसे




KOLHAPUR:
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सायबर जगतातील आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे:आशुतोष कापसे

जयसिंगपूर दि.२०
नव तंत्रज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली असली तरी त्यातील धोके वाढले आहेत. सायबर हल्ल्यामुळे आर्थिक आणि जीवितहानीला आपल्याला सामोरे जावे लागते. यातून आपला बचाव करण्यासाठी सायबर जगतातील आपत्ती व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असे मत सायबर विषयाचे तज्ञ आशुतोष कापसे यांनी मांडले.



ते संजय घोडावत विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत आभासी पद्धतीने मार्गदर्शन करत होते .
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ,एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सायबर जगतातील स्थिती या विषयावर ते बोलत होते.



यावेळी कापसे यांनी सायबर सुरक्षा आणि सद्यस्थिती याचा आढावा घेतला. सायबर स्पेस मध्ये सायबर हल्ल्यांचे प्रमाण कशा पद्धतीने वाढले आहे ,सायबर गुन्हे कसे होतात, यापासून आपण कसे सुरक्षित राहायला हवे यावर त्यांनी मार्गदर्शन केले.मानव निर्मित या आपत्तीमध्ये तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक वापर केल्यास होणारे धोके टळू शकतात, 


त्यासाठी सायबर साक्षरता महत्वाची असल्याचा उल्लेख त्यांनी केला.या कार्यशाळेच्या माध्यमातून सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम निर्मिती करण्याची संधी आहे,त्यासाठी हि कार्यशाळा महत्वाची आहे.अशा पद्धतीची कार्यशाळा घोडावत विद्यापीठाने आयोजीत केली याबद्दल कुलगुरू डॉ.अरुण पाटील आणि विश्वस्त विनायक भोसले यांचे त्यांनी अभिनंदन केले तर कार्यशाळेस मार्गदर्शन केले बद्द्ल कार्यशाळेचे समन्वयक प्रा.इंगळे यांनी आभार मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________