KOLHAPUR: राजाराम कारखाना 122 गावांचा आहे व तसाच राहणार. - अमल महाडिक. *राजारामच्या सभासदांची वार्षिक सभेत दिवाळी गोड*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: राजाराम कारखाना 122 गावांचा आहे व तसाच राहणार. - अमल महाडिक. *राजारामच्या सभासदांची वार्षिक सभेत दिवाळी गोड*



KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे


राजाराम कारखाना 122 गावांचा आहे व तसाच राहणार. - अमल महाडिक. *राजारामच्या सभासदांची वार्षिक सभेत दिवाळी गोड*

राजाराम कारखान्याची सन 2021-22 ची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.30-09-2022 इ.रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होऊन सभेचे कामकाज तब्बल दिड तास चालून खेळीमेळीत संपन्न झाली आहे. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या विषयांना उत्स्फूर्त मंजूरी दिली.


सभेस प्रारंभ छ.शिवाजी महाराज, राजर्षि छ.शाहु महाराज व छ.राजाराम महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाला. राजाराम कारखान्याच्या या सभेस आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी सभासदांनी उपस्थिती दर्शविली. प्रास्ताविक व स्वागत कारखान्याचे चेअरमन मा.दिलीप पाटील यांनी करून कारखाना मा.आ.महादेवरावजी महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 28 वर्षे सक्षमपणे सुरू असून येत्या गळीत हंगामात किमान 5 लाख मे.टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी सर्व सभासदांनी आपला ऊस गळीतास पाठवावा असे आवाहन त्यांनी केले. त्रिपक्षीय करार प्रथम लागू करून वेतन वाढ दिल्याबद्दल कामगार संघटनेने मा.आ.महादेवरावजी महाडिक यांचे आभार मानून सत्कार केला.


तद्नंतर सभेमधील सभासदांना संबोधित करताना कारखान्याचे संचालक मा.आ.अमल महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या सभासदांना सभासद साखरेमध्ये प्रती महिना एक किलो आणि दिपावलीसाठी विशेष बाब म्हणून तीन किलो साखर वाढविणेचा निर्णय जाहिर केला आणि सभासदांची दिवाळी गोड केली.


कारखान्यास 9000 हेक्टरची नोंद होते तथापी 4000 हेक्टर ऊसाचे गळीत करणे शक्य होते. याकरीता कारखान्याचे विस्तारीकरण आणि सहविज निर्मिती प्रकल्प उभारणीशिवाय पर्याय नाही. कारखान्याच्या 121 गावच्या सभासदांच्या वतीने मी आवाहन करतो की, कारखाना हा कसबा बावड्याच्या पुण्यभूमित उभा आहे. त्यामुळे कारखान्याच्या पुढील वाटचालीमध्ये कसबा बावडा गावचे योगदान मला आवश्यक असून त्याकरीता जी जी मदत लागेल ती कसबा बावडा गावच्या सभासदांनी करावी आणि ते निश्चितच करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्व सभासदांना बरोबर घेऊन कारखाना प्रगती पथावर नेण्यासाठी आग्रही भूमिका विशद केली.

कारखान्यामार्फत सभासदासाठी विविध ऊस विकासाच्या योजना राबविणेत येत असून त्या सर्व सभासदांपर्यंत पोहचवणार तसेच त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. कारखान्याचे अर्थकार हे साखरेच्या दरा भोवती केंद्रीत असून केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर रू.3100/- प्रति क्विंटल वरून रू.3500/- प्रति क्विंटल करावा तसेच 80 लाख मे.टन साखर निर्यातीचा कोटा जाहिर करावा अशी विनंती करून केंद्र शासनाने सहकारी साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्सचा जठील प्रश्न सोडविला याबद्दल देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी तसेच केंद्रीय सहकार मंत्री मा.अमितजी शाह यांचे आभार मानून अभिनंदनाचा ठराव मांडला.

कार्यकारी संचालक श्री.चिटणीस यांनी संपूर्ण विषयपत्रिकेचे वाचन केले आणि सभासदांनी विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे सभेमध्ये स्पष्टीकरणासह सविस्तरपणे वाचून दाखविली. तसेच ही सर्व उत्तरे संबंधित सभासदांना लेखी पाठविली असून त्याची माहिती ऍ़पव्दारे सर्व सभासदांना अवगत केले असलेचेही सांगितले. त्यासही सभासदांनी उत्स्फूर्तपणे हात उंचावून प्रतिसाद दिला.

आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक श्री.राजाराम दत्तात्रय मोरे यांनी केले आणि राष्ट्रगीत होऊन सभेची सांगता झाली. सभेस कारखान्याचे व्हा.चेअरमन व संचालक मंडळ सदस्य तसेच सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

____________________________________________________

              या बातमीचे प्रायोजक आहेत...

        
हमसफर ट्रॅव्हल्स ,पोलीस स्टेशन समोर ,पेट्रोल पंपा जवळ हातकलंगले, जिल्हा कोल्हापूर.

____________________________________________________