BREAKING NEWS
लोकसंदेश प्रतिनिधी नाशिक
नाशिक : बस कंटेनर अपघातात बसला आग, 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी...
पीएम मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर मृताना मदत..
या घटनेतील मृतांचा नेमका आकडा अद्याप निश्चित झालेला नाही, पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांकडून पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
हायलाइट्स
* या घटनेची माहिती शनिवारी पहाटे मिळाली
* मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले
* वृत्तानुसार बसने प्रथम कंटेनरला धडक दिली आणि नंतर आग लागली
नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक शहरात बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 24 जण भाजले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेच्या वेळी 'स्लीपर' कोच या खासगी बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते.
या बसने नांदूर नाका येथे ट्रकला धडक दिली आणि काही मिनिटांत आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.
मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींपैकी बहुतांश बस प्रवासी असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघात ्ग्रस्त बस ज्या ट्रकला धडकली तो ट्रक धुळ्याहून मुंबईकडे जात होता, असे ही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद मिरची चौकात हा अपघात घडला
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या भीषण बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात एका लहान मुलासह १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बस अपघातातील जखमींची नावे
१. अमित कुमार - वय ३४
२. सचिन जाधव - वय ३०
३. आश्विनी जाधव - वय २६
४. अंबादास वाघमारे - वय ४३
५. राजू रघुनाथ जाधव - वय ३३
६. निलेश प्रेमसिंग राठोड - वय ३०
७. भगवान श्रीपत मनोहर - वय ६५
८. संतोष राठोड - वय २८
९. हंसराज बागुल - वय ४६
१०. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा - वय ७९
११. त्रिशिला शहा - वय ७५
१२. भगवान लक्ष्मण भिसे - वय ५५
१३. रिहाना पठाण - वय ४५
१४. ज्ञानदेव राठोड - वय ३८
१५. निकिता राठोड - वय ३५
१६. अजय देवगण - वय ३३
१७. प्रभादेवी जाधव - वय ५५
१८. गणेश लांडगे - वय १९
१९. पूजा गायकवाड - वय २७
२०. आर्यन गायकवाड - वय ८
२१. इस्माईल शेख - वय ४५
२२. जयनुबी पठाण - वय ६०
२३. पायल शिंदे - वय ९
२४. चेतन मधुकर
२५. महादेव मारुती
२६. मालू चव्हाण - वय २२
२७. अनिल चव्हाण - वय २८
२८. दीपक शेंडे - वय ४०
या घटनेतील मृतांचा नेमका आकडा अद्याप निश्चित झालेला नाही परंतु पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांच्या पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्धीत म्हटले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई .