आज १३ ऑक्टोबर किशोरकुमार यांचा पुण्यस्मरण दिन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आज १३ ऑक्टोबर किशोरकुमार यांचा पुण्यस्मरण दिन...




MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

 आज १३ ऑक्टोबर किशोरकुमार यांचा पुण्यस्मरण दिन...


किशोरकुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ यादिवशी खंडवा (मध्यप्रदेश) येथे झाला.

वडील :- अँड. कुंजलाल
गंगोपाध्ये-गांगुली
आई :- गौरादेवी
भाऊ :- अशोककुमार, अनुपकुमार.

किशोरदांच्या जीवनात पत्नी म्हणून चार सौदर्यवती आल्या. रुमादेवी, मधुबाला, योगीताबाली आणि लिना चंदावरकर.


के. एल. सैगल हे त्यांचं आराध्यदैवत ! एकलव्याप्रमाणे सैगलना गुरू स्थानी मानून त्यांनी संगीताची आराधना केली.

किशोरदांच्या हरहुन्नरी आवाजाची खरी पारख केली ती संगीतकार खेमचंद प्रकाश ह्यांनी. किशोरदांना जिद्दी चित्रपटामध्ये पार्श्वगायक म्हणून सर्व प्रथम संधी दिली ती खेमचंद प्रकाश यांनी.

किशोरदांनी पहिल गाणं सैगल ढंगात देवानंद यांच्यासाठी गायलं. सैगल ढंगातुन किशोरदांना बाहेर काढलं एस.डी. बर्मन ह्यांनी.

१९६९ च्या शक्ती सामंतच्या आराधना या चित्रपटापासून त्यांच्या नशिबाचे कवाड उघडले.


किशोरदांचा आवाजाच्या भोवती देवानंदच्या आवाजाची जी भिंत निर्माण झालेली होती ती आराधनाच्या हिटमुळे पटकन कोसळून पडली आणि खऱ्या अर्थाने किशोरकुमार युग सुरू झालं. पडद्यावर येणाऱ्या प्रत्येक नायकाला त्यांचा आवाज शोभू लागला. राजेंद्रकुमार, शम्मीकपूर, जॉय मुखर्जी, सुनील दत्त, जितेंद्र, धर्मेंद्र यांना किशोरदांचा आवाज ही कल्पनाच एकेकाळी कोणी सहन केली नव्हती, पण या सर्वांसाठी किशोरदां सर्रासपणे गाऊ लागले.
त्यानंतर जे किशोरदांचें युग सुरू झालं ते झालंच !


किशोर कुमार फॅन क्लब

किशोरदां हे स्वयंभू गायक होते. राजेश खन्ना युग संपले आणि *अँग्री यंग मॅन अमिताभ* ह्यांचा झंझावात सुरू झाला;
पण किशोरदांना काही फरक पडला नाही. अमिताभ ह्यांच्या यशामध्ये किशोरदांच्या रांगड्या स्वराचा जबरदस्त सहभाग होता.
याँडलिग हा प्रकार किशोरदांनी भारतात सर्वप्रथम आणला. युरोपमध्ये प्रचलित असलेल्या स्विस आणि ट्रायोलिज गान पद्धतीचे अनेक प्रयोग जिमी रॉजर्स हा कलाकार करीत असे. किशोरदांनी जिमीच्या ध्वनिमुद्रिका ऐकून हा प्रकार आत्मसात केला आणि तीच पुढे किशोरदांचीं ओळख ठरली.

ते शास्त्रीय संगीत कधीही शिकले नाहीत तरीही पडोसन मधील शास्त्रीय टच *एक चतुर नार* या गाण्यामध्ये त्यांनी जो कहर केला तो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
त्या गाण्यामुळेच पडोसन चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

मुंबईच्या लायन्स क्लबने सलग १४ वर्ष त्यांना उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार दिला. बंगालच्या फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा पुरस्कार मिळणं ही मोठी अपूर्वाईची गोष्ट आहे. या असोसिएशनने सुद्धा त्यांची सात वेळा उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कारासाठी निवड केली होती. मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार आणि लांस एजिलीसने दिलेला ई.एम.आय.चा गोल्डन डिस्क पुरस्कार हे दोन मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले.

                     किशोर कुमार फॅन क्लब

*सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार तब्बल आठवेळा त्यांना मिळाला. सलग चार वर्षे ते फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले.*
परंतु त्यांना केंद्र शासनाचा एक हि पुरस्कार मिळाला नाही याची आम्हा किशोरदां प्रेमीना खंत आहे

ते निर्माता, संगीतकार, गीतकार, नायकहि होते परंतु त्यांचे करिअर गायक म्हणून खूप गाजले. त्यांनी
विविध भाषेत २८५० गाणी गायली.

मेहबूब स्टुडिओमधे
१३ ऑक्टोबर १९८७ यादिवशी वक्त की आवाज या चित्रपटातील *मैं हू सबका मेरा ना कोई* या गीताच्या रेकॉर्डिंगची तारीख नक्की केली होती. परंतु किशोरदांनी १३ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. आणि ते गीत १२ ऑक्टोबर या दिवशी गायले. १३ ऐवजी १२ तारखेचे कारण त्यांना विचारले गेले तेव्हा ते असे म्हणाले, १३ तारखेला मी आराम करणार आहे.
कदाचित त्यांना १३ तारखेला त्यांचा मृत्यू समोर दिसला असेल का ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे न देताच ते
*१३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी आपल्या सर्व चाहत्यांना सोडून परमेश्वराच्या चरणी कायमचे आराम करायला निघून गेले.* 


परमेश्वराला आजच्या दिवशी एकच प्रार्थना..
I request God to give one more life to the *किशोरदा* 🙏

*हरहुन्नरी गुरुदेव किशोरदांना पुण्यस्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.*

*किशोरदांना एकच विनंती किशोरदा Plz Come Back*


🖋️
गिरीश लोहाना, सांगली
९८६०७ ४४४११

लोकसंदेश न्यूज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________