हरवलेले बालपण ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हरवलेले बालपण ...




                        हरवलेले बालपण ...

हंड्यात  तापलेल्या पाण्याची अंघोळ न्हाणीतली असायची.

लाईफबाॅयशिवाय दुसरी कंपनी माहीती नसायची...
ok,501 साबणाची वडी कपड्यावर घासायची... कधी कधी अंगावर पण असायची...


Moti साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं.


शाम्पू कुठला लावताय राव, निरम्यानचं डोकं धुवायचं...आणि दगडाच्या चीपि न अंग घासायचं.
...


दिवाळीच्या एका ड्रेसवर वर्षभरमिरवायचं...
शाळेतल्या फाटक्या ड्रेस वर वावरायचं.. .     

थोरल्याचं कापडं धाकट्यानं झिजेपर्यंत वापरायचं...

चहा चपातीची न्याहरी, उप्पीट,पोहे कौतुकाने असायचे,

पार्ले बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे...


 
गोलपंखीत सर्वजण बसून जेवायचं... तीच मोठी पार्टी असायची.   

खर्डा भाकरी,झुणका पंचपक्वानासारखं लागायचं.

गोट्या,विटीदांडू,लपाछपी........



कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा...

काचाकवड्या,जिबली.. नाहीतर.....
भातुकलीचा डाव मांडायचा...

अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं...
नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं...



मणगटाची बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा..
गाड्याला काय कमी नव्हतं ..रेल्वे न रेल्वेचे डबे पण असायचे.

*शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट व वांड  असायचा...

पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... मेहंदीचा  हा दर्प तीन दिवस असायचा....

*बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची...


*मनोरंजनासाठी* असायची *ब्लॅक अॅन्ड व्हाईट टि.व्ही.*
*शनिवारी हिंदी* आणि *रविवारी मराठी* मुव्ही...
*रामायण,महाभारतं शक्तीमानसाठी* रविवारची वाट बघायची...

*चित्रहार,रंगोली,छायागीत* यातून सलमान,माधूरी भेटायची.....


शाळेला तर नियमित जायचं
वायरीचं दप्तर पाठीवर असायचं...

उरलेल्या पानांची वही बायडिंग  करायची...
निम्म्या*किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची...

घासातला घास शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे...
बाॅटल* कुठली राव...........
टाकीच्या* नळाला तोंड लावून पाणि प्यायचं...

जमेल तेवढं करत होतो, *टेन्शन* काय नसायचं...
*कारण,* नुसतं पास झालो तरी *आई-बाप* खूष असायचं...


*पावसाळा* आला की पोत्याची गुंची करायची...
*चिखलातनं* वाट काढताना *स्लिपर* त्यात रूतायची...

एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो...
*रिक्षा,स्कूल बस* नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.

*दिवसभर* हुंदडून *पेंगत पेंगत* जेवायचं
एकाच *अंथरूनावर* ओळीनं सगळ्यांनी *निजायचं...

वाकळंतल्या* ऊबीत झोप मस्त लागायची...
दिवसभराची* मस्ती रात्री *स्वप्नात* दिसायची...........


*दिवस* पुन्हा उजडायचा *नवी मजामस्ती* घेऊन...
*रात्रीच्या अंधाराला* तिथेच मा गे ठेवून...

*संस्मरणीय आठवणी...
बालपणीचा काळ आठवला......
आता आपण मोठे झालो पैसा पण मोठा झाला  ... सर्व सुविधा आल्या... परंतु बालपणीची मजा काही वेगळीच होती.  .




 देवा. ........  आम्हाला परत एकदा बालपण देगा देवा. . ...

मामाच्या मांडीवर "मी" बाजूला आमच्या मातोश्री


सलीमभाई नदाफ
संपादक ;
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________