YAWATMAL
लोकसंदेश प्रतिनिधी::-मनोज राहुलवाड,ढाणकी
बिटरगाव पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग...
पाच अट्टल चोरटे जेरबंद...
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. मागील दोन महिन्यापासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्याने चांगला धुमाकूळ घातला होता. रात्रीच्या वेळी ला ग्रामीण भागात घरात घुसून घरफोडी करून प्रसार होणाऱ्या चोरट्याने दहशत निर्माण केली. रात्रीच्या वेळेला झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून पळ काढणाऱ्या चोरट्याला अखेर बिटरगाव पोलीसांनी सिनेटाईल पाठवला करून चोरट्यास जेर बंद केले. पोलीस स्टेशन बिटरगाव येथेच गावात रात्रीला एक वाजता चोरट्याने धुमाकाळ घातला जवळपास 94500 रुपयांचा मुद्देमाल लंपास करून चोरट्याने पोबारा करण्याचा प्रयत्न करत असल्याची खबर पोलिसांना लागतात रात्रीलाच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस सापळा रचून पैनगंगा नदीवर असलेल्या गांजगाव व पिंपळगाव या पुलावरील नाकाबंदी करून रात्रीला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी समोरून येणाऱ्यांना गावातील पोलीस मित्रांना सोबत घेऊन पोलिसांनी अचानक चोरट्याला मोठ्या शिताफीने पकडले.पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.
दि.२७/०९/२०२२ रोजी शेख शबिर शेख हनिफ वय ३५ वर्ष रा. बिटरगाव यांचे घरी दि.२७/०९/२०२२ रोजी चे रात्री ०१/०० वा घराचा कोंडा तोडुन सात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करूण रॉड व कु-हाडीने वार करून जीव घेणा हल्ला करूण फिर्यादीला जखमी केले तसेच घरातील दागदागीने पत्नीच्या गळयातील असा एकुण ५४,०००/ रू चा मुददेमाल बळजबरीने हीसकावुन घेवुन पळुन गेले. तसेच राजु गुलाबराव देवकते यांचे १५०० / रू. शेख सुफीया शे. मुसा यांचे गुळयातील सोन्याची पोत अंदाजे ३५०००/रू, संजय गंगाराम बुटले यांचे १०००/रू व हनुमान मंदीर येथील दानपेटी फोडुन ३०००/रू असे एकुन ९४,५००/ रु मददेमाल जबरीने चोरून नेले तसेच वनविभाग जेवली रोड वनविभागाचे पोस्टची तोडफोड करून सरकारी मालत्तेचे ५०,००० / रू चे नुकसान केले आहे. . चोरट्याने पोलीसावर हमला करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसानी हमला चुकवुन ५ ते ७ आरोपी मधील ३ आरोपीना बिटरगाव व पिपळगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतिने जागीच पकडले व ४ आरोपी हे पळुण गेले. पळुन गेलेल्या आरोपी शोध कामी दोन पथके नेमुण एक पथक गांजेगावकडे व एक पथक जेवली पिपळागव येथे रवाना केले. गांजेगावकडील पथकानी गांजेगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतीने दोन आरोपी पकडले. त्या आरोपीचे नावे पुढील प्रमाणे
१) जाकी बावाजी चव्हाण वय २८ वर्षे रा. सोनारी ता. हीमायतनगर जि. नांदेड
२) मांगीलाल श्रीरंग राठोड वय ३८ वर्षे रा. हीमायतनगर जि.नांदेड ३) विकास श्रीरंग राठोड वय २२ वर्षे रा. हीमायतनगर जि. नांदेड
४) निलेश गब्बरसीगं राठोड वय २२ वर्षे रा हदगाव जि.नांदेड ५) दत्ता मांगीलाल राठोड वय ३० वर्षे रा. गणेशवाडी ता. हीमायतनगर जि.नांदेड वरील १ ते ५ आरोपी यांचेकडुन गुन्हयात वापरलेले ०३ चाकु, १ रॉड, ०१ कु-हाड, दोन मोबाईल किमंत २०००० रू गुन्हयात चोरी गेलेल्या मालापैकी २२ तोळच्या चांदीचे गटन किमंत २०००० रू १ जोडवे किमंत २००० रू व ७ ग्राम सोन्याचा गळातील हार असा एकुण ७७००० रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील प्रमाणे आरोपीना ताब्यात घेवुन दरोडा सारखा गंभीर गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हात चोरी गेलेला मुद्देमाल ९4५०० पैकी ७७००० रू चा मुद्देमाल हस्तगत करून वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
सदर ची कार्यवाही मा. दिपील पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.प्रदिप पाडावी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शाना मध्ये पोलीस स्टेशन बिटरगांव चे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस,पोउपनि कपील म्हस्के, पोना मोहन चाटे, सतिष जारंडे, गजानन खरात, रवि गिते मपोना विध्या राठोड, पोकों दत्ता कुसराम, सतिष चव्हाण, निलेश भालेराव, स्वप्नील रायवाडे चालक फिरोजी काझी महो चंद्रमणी वाढवे . पोलीसानी सिनेस्टाईल पाठलाग करून ३ आरोपी पिपळगाव पुलावरून व दोन आरोपी गांजेगाव येथील पोलीस मित्राचे साहयाने ताब्यात ४ तासाचे आत ताब्यात घेतले. बिरगांव पोलीसानी कौश्यल्यपूर्वक तपास करून उल्लेखनिय कामगीरी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनामध्ये पोउपनि कपील म्हस्के करत आहेत.
बिटरगाव पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले तसेच ज्या नागरिकांनी पोलिस मित्रांनी चोरांना पकडण्यास मदत केली त्यांचाही यथोचित सन्मान पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली