SATARA
लोकसंदेश महाबळेश्वर प्रतिनिधी प्रकाश पाटील
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अवसरी गावात म्हशी धुवायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
शनिवार व रविवार दोन दिवस त्याचा शोध चालू होता शेवटी ग्रामस्थांना अपयश आले व आज सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स टीम व प्रतापगड रेसक्यु टीम यांना पाचारण करण्यात आले
महाबळेश्वर ट्रॅकर टीम व प्रतापगड रेस्क्यू टीम यांनी त्वरीत हालचाली करून अवसरी गावाच्या दिशेने रवाना झाली बोटच्या साहाय्याने दोन्ही टीम दत्ता चा शोध घेत होत्या 7 तासांच्या अथक परिश्रमानंतर दत्ता चा मृतदेह शोधण्यात दोन्ही टीम च्या जवानांना यश आले या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स चे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी जयवंत बिरामणे, अनिकेत वागदरे, व प्रतापगड रेसक्यु टीम चे अजित जाधव, आशिष बिरामणे, तेजस जवळ, अभिषेक भिलारे हे जवान सहभागी होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली