SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी इरफान बारगीर
मिरज येथे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने चालक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने चालक दिन मोठ्या उत्साहात मिरज येथे संपन्न झाला
यावेळी या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले ...नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शिंदे यांनी आपल्या व्यवसायाच्या अडीअडचणीवर सरकारची लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.. आजच्या परिस्थितीला मालक असो ड्रायव्हर असो व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे खर पाहायला गेलं तर ड्रायव्हर हा देशाचा जीव असतो... गाड्या चालल्या तर देश चालणार आहे.. नाहीतर गाड्या जिथल्या तिथं ठप्प झाल्यानंतर देश कसा चालतो असा त्यांनी सवाल उपस्थित केला... वाहनांच्या किमतीत झालेली वाढ ...व्यवसायात आलेली मंदी... डिझेल पेट्रोलचे वाढलेले दर.. टायरची वाढलेले रेट... यामधून सर्व मालक व ड्रायव्हर लोकांची कुचंबना होत आहे . परंतु सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही..त्या मुळे आज वाहन व्यवसाय करणे जिकिरीचे व अडचणीचे असल्याचे ही ते म्हणाले.. ...त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करून याचा पाठपुरावा करणार असल्याचे ही ते म्हणाले.. याविषयी सर्व महाराष्ट्रातून संघटनेच्या वतीने एकत्रित येऊन याचा पाठपुरावा करण्यासाठी .. सरकार दरबारी आपले प्रश्न मांडण्यासाठी लवकरच एक मेळावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले
मिरज शहरातील नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑफिस, वाॅन्लेस हॉस्पिटल, अंबुलन्स स्टॉप, इंडियन ऑइल स्टॉप, येथील सर्व चालक बांधवांना नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा. राजू शिंदे उपाध्यक्ष पत्रकार मा. इरफानभाई बारगीर शहराध्यक्ष मा.प्रमोद सौंदडे मा.पावलस खिल्लारे मा.राहुल गायकवाड या सर्वांनी समक्ष भेटून ड्रायव्हर बांधवांना फुलगुच्छ देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे उपाध्यक्ष पत्रकार इरफान भाई बारगीर यांनी सर्व चालक-मालक बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी चालक मालक व इतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
______________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत
www.caroldpart.com
______________________________________________________________
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली