SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
विश्वाज्ञा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्राचे नुतन जागेत स्थलांतर
श्री विश्वाज्ञा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र, सांगली यांचे वरद मोरया अपार्टमेंट, दक्षिण शिवाजी नगर सांगली या नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. हा स्थलांतर सोहळा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, भाजप प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, माजी महापौर गीता सुतार, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेवक अभिजित भोसले, जि.प.स. संग्राम पाटील, चितळे उद्योग समूहाचे उद्योजक गिरीष चितळे, जि.प.स. सुरेंद्र वाळवेकर, डॉ. योगेश शेटे, डॉ. पुष्पलता शेटे व शेटे कुटुंबिय उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली