SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
तालुका मिरज कवलापूरमध्ये बांधकाम कामगाराचा निर्घृण खून; हल्लेखोर फरारी खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून खुनाचे कारण समजले नाही....
सांगली : मिरज तालुक्यात कवलापूर येथे विमानतळाच्या खुल्या जागेत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास फरशी कामगाराचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. विठ्ठल बाळकृष्ण जाधव वय ४०, रा. बनशंकरी मंदिराशेजारी बुधगाव ,असे मृताचे नाव आहे. खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,मृत विठ्ठल जाधव हा बुधगावमधील बनशंकरी मंदिराशेजारी आईसह राहतो ,तो फरशी बसविण्याचे कामे करत होता. सोमवारी सकाळी तो कामासाठी घरातून बाहेर पडला होता. नियोजित विमानतळाच्या खुल्या जागेत एकजण रक्ताच्या थोराळ्यात पडल्याचे काही तरुणांना दिसले त्यांनी तातडीने ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.
सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विठ्ठल याच्या डोक, कपाळ, तोंड व पायावर धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणला. हा खून नेमका कोणी केला, त्या मागचे कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नाही. किरकोळ वादातून खून झाल्याची चर्चा सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत याची नोंद करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळी शहर विभागाचे उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट दिली. ग्रामीणचे सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, सागर पाटील, अंमलदार रमेश कोळी, संदीप मोरे, कपिल साळुंखे, महेश जाधव तपास करत आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही संशयितांच्या मागावर आहे.
विमानतळा जवळ घटना घडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला तांब्या, बांधकामाचे टेप, चप्पल या वस्तू पोलिसांना मिळून आल्या. विठ्ठल हा अविवाहित होता. त्याच्या दोन्ही बहिणीचा विवाह झाला आहे. तो आईसह बनशंकरी मंदिराशेजारी रहात होता
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली