SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
गृहनिर्माण संस्थांचे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियानात सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभाग घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 05, : सहकार विभागामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान राबविण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील कार्यरत सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घेण्याकरीता उपनिबंधक सहकारी संस्था मिरज कार्यालयाशी संपर्क साधून परिपूर्ण माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्था मिरज चे उपनिबंधक सुनिल चव्हाण यांनी केले आहे.
या अभियानामध्ये प्रामुख्याने संस्थांचे सुव्यवस्थापन कसे असावे व यामध्ये संस्थेमार्फत संस्थेच्या फायद्याचे उपक्रम कशा पध्दतीने राबवावे याची माहिती दिली आहे.
या अभियानांतर्गत सौर उर्जावरील विद्युतीकरण, पावसाच्या पाण्याची साठवण, कंपोस्ट खत अशा प्रकारच्या उपक्रमाची माहिती दिली आहे. तसेच तंटामुक्त व सल्लागार समितीची निर्मिती करणे अशा प्रकारचे विषय यामध्ये नमुद केले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली