SANGLl
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
साहित्यरत्न,सत्यशोधक,शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा जवळ साखर वाटप...
जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न, सत्यशोधक, आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा व तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रशियाची राजधानी मास्को येथे पार पडला.
या निमित्ताने सर्व सांगलीकरांचा वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ साखर व पेढे वाटण्यात आले.
थोर साहित्यिक आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळात पोलीस निरीक्षक मा.पुजारी साहेब व मयुर पाटिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मा.सुरेश दूधगावकर, मा.अशोक पवार, मा. कांबळे, मा.मयुर पाटिल, मा. सूर्यकांत लोंढे, मा.आकाश तिवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वांनी सांगली मधे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच स्मारक व अधिकृत पुतळा करावा असा सुर धराला व केंद्र सरकारने लवकरात लवकर आण्णा भाऊंना भारतरत्न देवून सन्मानित करावे हि मागणी आपल्या बोलण्यातून सर्वांनी मांडली .
यावेळी मा.किरणराज कांबळे,मा.विजय आवळे,मा.कुमार वायदंडे,मा.विशाल मोरे, मा.संजय कांबळे,मा.गजानन बन्ने, मा.तौफीक शिकलगार,मा.अमर मगदूम,मा.आबा सुवासे,मा.समर सरूदे,मा.सचिन केंचे. मा.मारतंड लोंढे, मा.किरण देवकुळे, मा.राहुल वायदंडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मा.आकाश तिवडे यांनी केले तर प्रस्तावना मा. कांबळे यांनी केले,
शेवटी आभार विजय आवळे यांनी मांडले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली