SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली जिलह्यातील आसंगी येथे पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक, गुन्हे अन्वेषण विभाग व जत ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई कारवाई :
सांगली : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आसंगी तुर्क (ता. जत) येथील मीरासाब मोहद्दीन मुजावर (वय ३०) या तरुणाला गुरुवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी प्रत्येक विभागात वेगवेगळी पथके नियुक्त केली गेली आहेत. गुरुवारी जत परिसरात पथकाकडून गस्त सुरू असताना हवालदार विनायक सुतार यांना आसंगी तुर्क येथील बसवन मंदिर जवळ एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने आसंगी तुर्क कडे धाव घेत मीरासाब मुजावर याला ताब्यात घेतले.
हवालदार दीपक गायकवाड यांनी त्याचाकडे चौकशी केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले, तर या पँटच्या खिशातून दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. हवालदार माने यांनी मीरासाब मुजावर याला सुसज्य शस्त्रासह ताब्यात घेऊन उमदी ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केले. या कारवाईत ऋषिकेश सदांमते, सुधीर गोरे यांनीही सहभाग घेतला. जत ग्रामीण पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली