SANGLI मिरजेत स्वर्गीय मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे उदघाटन : पहिल्याच दिवशी 8 नाट्य संस्थाकडून सादरीकरण :

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI मिरजेत स्वर्गीय मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे उदघाटन : पहिल्याच दिवशी 8 नाट्य संस्थाकडून सादरीकरण :




SANGLI 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी


मिरजेत स्वर्गीय मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे उदघाटन : पहिल्याच दिवशी 8 नाट्य संस्थाकडून सादरीकरण :

स्पर्धेसाठी राज्यभरातून 25 दर्जेदार नाट्यसंस्था दाखल : विजेत्या संघाला मिळणार 1 लाखाचे बक्षिस आणि मदनभाऊ महाकरंडक चषक: जेष्ठ रंगकर्मीचाही होणार गौरव



सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे स्व. मदनभाऊ पाटील स्मृती मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धला सुरवात झाली. शनिवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत एकांकिका स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.


मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात या एकांकिका स्पर्धा होत असून २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. या स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे. प्रथम क्रमांकास रोख रुपये १ लाखाचे बक्षीस व मानाचा मदनभाऊ महाकरंडक व
प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये ५०,०००/- मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये २५,०००/- मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 25 नाट्यसंस्था मिरजेत दाखल झाल्या आहेत. यामधे कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज आदि शहरांतून नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत. शनिवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते आणि काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील , विरोधीपक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका बबिता मेंढे, स्वाती शिंदे, भारती दिगडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत एकांकिका स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.




        या शनिवारपासून सुरू झालेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रविवार आणि सोमवारी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सादर होणार आहेत. यामध्ये निवडलेल्या नाट्यसंस्था या महाराष्ट्रातील नावाजलेल्या आहेत. नाट्यसंस्थांसाठी रहाण्याची व जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आलेली आहे. तसेच एकवेळचा प्रवास खर्च देण्यात आलेला आहे. गेली २ वर्षे कोरोना काळामुळे या स्पर्धा होवू शकल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी स्पर्धक संघामधे व




रसिकांच्यामधे या स्पर्धेविषयी उत्सुकता आहे. या एकांकिका स्पर्धा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतील कला रसिकांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. त्यामुळे या वर्षीपासून आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील जेष्ठ रंगकर्मी ज्यांनी नाट्यपंढरी सांगली नगरीचा लौकीक वाढवला व त्यांच्या रंगकार्याने नव्या पिढीसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला अश्या जेष्ठ रंगर्मींना जेष्ठ रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोमवारी सायंकाळी 7 वाजता राज्याचे कामगार मंत्री नाम. सुरेश खाडे आणि खासदार संजयकाका पाटील , माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालय, विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली