SANGLI: लोकसंदेश न्यूज बातमीचा इफेक्ट.....महापालिकेकडून भटकी श्वान पकडण्याची मोहीम सुरु : शनिवारी 13 भटकी श्वान पकडली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: लोकसंदेश न्यूज बातमीचा इफेक्ट.....महापालिकेकडून भटकी श्वान पकडण्याची मोहीम सुरु : शनिवारी 13 भटकी श्वान पकडली




SANGLI: लोकसंदेश न्यूज बातमीचा इफेक्ट

महापालिकेकडून भटकी श्वान पकडण्याची मोहीम : शनिवारी 13 भटकी श्वान पकडली : 5 मादी श्वानाची नसबंदी : 

मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भटकी श्वान पकडण्याची मोहीम अधिक तीव्र होणार.....



           सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भटकी श्वान पकडण्याची मोहीम

हाती घेण्यात आली आहे. शनिवारी मनपाच्या डॉग युनिटकडून सांगली मिरजेतील 13 भटकी श्वान पकडण्याली. यामध्ये 5 मादी श्वानाची नसबंदीही करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग युनिटकडून भटकी श्वान पकडण्याची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली.


मनपाक्षेत्रात भटक्या श्वानांकडून लहान मुलांवर हल्ल्याचे घटनानंतर शुक्रवारी महापालिका मुख्यालयात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, गंटनेते विनायक सिंहासने, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्या उपस्थितीत श्वान नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यासाठी प्राणीमित्र यांच्या उपस्थितीत बैठक झाली.




या बैठकीत ठरल्याप्रमाणे मनपाक्षेत्रातील भटकी श्वान पकडण्याची मोहीम शनिवारपासून अधिक तीव्र करण्यात आली. यामध्ये आज दिवसभर शिंदे मळा, राजवाडा परिसर, मिरज ब्राम्हणपुरी, कोल्हापूर रोड, जुना हरिपूर नाका, माणिकनगर, कुपवाड रोड, जयहिंद कॉलनी आदी परिसरात डॉग युनिट कडून श्वान पकडण्याची मोहीम घेणेत आली.


शनिवारी मनपाच्या डॉग युनिटकडून सांगली मिरजेतील 13 भटकी श्वान पकडण्याली. यामध्ये 5 मादी श्वानाची नसबंदीही करण्यात आली आहे. यापुढेही मोकाट श्वान पकडण्याची मोहीम अशीच तीव्र केली जाणार असल्याचेही उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.

  

 लोकसंदेश न्यूज मीडिया च्या बातमीचा इफेक्ट

लोकसंदेश न्यूजने  कुत्र्यांच्या बाबतीत गेली वर्षभर प्रशासनाला जाब विचारत  नागरिकांच्या व्यथा प्रशासनावर बातमी रूपाने मांडल्या होत्या... त्याचा प्रत्यय म्हणजे आजपासून कुत्र्यांना पकडण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.... लोकसंदेश न्यूज नेहमीच नागरिकांच्या योग्य विषयावर सातत्याने आपली भूमिका मांडत असते, आणि नागरिकांच्या मनातले विषय मांडतच राहणार आहे...

https://www.loksandeshnews.com/2022/07/blog-post_57.html

 ....त्याचाच प्रत्यय म्हणून आज पासून कुत्री पकडण्याचा आदेश माननीय आयुक्तांनी दिला.... परंतु कुत्री पकडून नसबंदी करणे हा भाग वेगळा आहे आणि हीच कुत्री नसबंदी झाली असेल तरी त्याची वाढ  रोखली जाईल, परंतु त्यांचा हिंस्रपणा कमी होणार नाही त्यामुळे ही नसबंदी केलेली कुत्री परत रस्त्यावर जर सोडली तर " येरे माझ्या मागल्या "प्रमाणे ती बालकांच्यावर,वृद्धांच्यावर,माणसांच्या वर हल्लेच करणारच आहेत 

त्यामुळे आम्ही मागच्या बातमीत म्हणाल्या प्रमाणे वीस गुंठ्याचा प्लॉट घेऊन त्याच्यासाठी या कुत्र्यांना शहरात कुठेही मोकळे न सोडता त्यांना बंदिस्त करून नागरिकांना बिंनधास्त फिरण्याची मुभा सांगली महापालिकेकडून देण्यात यावी ...अशा आशयाची मागणी आम्हीं बातमी रूपाने केली होती, आणि आज पण आम्ही प्रशासनास हेच सांगतो आहोत, याची गंभीरपणाने प्रशासन ,अधिकारी दखल घेतील असा आमचा विश्वास आहे ...

सलीमभाई : संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सांगली.

LOKSANDESH NEWS MEDIA PVT. LTD. MUMBAI/ SANGLI