PUNE
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन...
पुणे: सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे. हा दूरध्वनी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. नागरिकांना जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे चे सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
_______________________________________________________________