MUMBAI:संजय राऊत यांना जामीन मिळणार?? सुनिल राऊत थेट दिल्लीत पोहोचले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI:संजय राऊत यांना जामीन मिळणार?? सुनिल राऊत थेट दिल्लीत पोहोचले




MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

संजय राऊत यांना जामीन मिळणार?? सुनिल राऊत थेट दिल्लीत पोहोचले.....

गेल्या एक महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामीनासाठी भाऊ सुनिल राऊत आता अॅक्शन मोडवर आले आहेत.मातोश्रीनंतर सुनिल राऊत थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तेथून पाय काढताच ते दिल्लीला दाखल झाले आहेत. सुनील हे दिल्लीत भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुटकेसाठी धडपड करीत असल्याची माहीती समोर आली आहे.


मागच्या कित्येक दिवसांपासून यांना पत्राचाळ प्रकरणाच्या आरोपाखाली संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. संजय राऊत यांनी दोन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता परंतु त्यांना अद्यापही जामीन मिळाला नाही. ईडीला त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे याबाबत कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भातच वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.


सुनिल राऊत काल रात्री उशीरा मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटालया बोलावले होते. त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली असे सुनील राऊत यांनी सांगीतले.

सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की, संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. त्यानंतर आता ते दिल्लीत पोहचले आहेत.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई