MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
नारी शक्ती पुरस्कारासाठी नामनिर्देशन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर
सांगली, दि. 13, केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याण व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून सन 2022 करीता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्जदाराने प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर भरावयाचे असून नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.
नामनिर्देशनासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. सर्व व्यक्ती आणि संस्थांसाठी पुरस्कार खुला आहे. वैयक्तिक श्रेणीच्या बाबतीत नामांकन मिळाल्याच्या 1 जुलै 2021 रोजीच्या तारखेस किमान वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेने संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षे काम केलेले असावे. पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रूपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली