KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे
हिंगणगाव येथे वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अभिजीत संजय कोळी यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वायफळ खर्चाला फाटा देत प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले अभिजीत कोळी यांचा आदर्श घेऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील नागरिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी शाळेतील असुविधा समस्या जाणून घेऊन वाढदिवसाच्या औचित्य साधून वायफळ खर्चाला फाटा देत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान राहुल रत्नपारखे यांनी केले ते हिंगणगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये अभिजीत कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भानुदास वसगडे होते
प्राथमिक विद्या मंदिराच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अभिजीत कोळी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राहुल रत्नपारखे मिरासो नायकवडे यांचाही सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अभिजीत कोळी यांच्या हस्ते करण्यात आले जवळजवळ 84 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मिरासो नायकवडे मुख्याध्यापक भानुदास वसगडे , जालिंदर ढोले प्रकाश खरात , तृप्ती लंबे, पुनम सांळुखे,पुजा कोकणे, सुप्रिया संकपाळ ,उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक भानुदास वसगडे यांनी केले आभार जालिंदर ढोले यांनी केले
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली