KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
इचलकरंजी कबनूर येथील नायकवडी ज्वेलर्सला आग तीन लाखाचे नुकसान ...
कबनूर येथील मुख्य चौकातील साखर कारखाना रस्त्याजवळील नायकवडी ज्वेलर्स या दुकानास शॉर्टसर्किटने आग लागली.आगीत दुकान जळून खाक झाले.
नायकवडी ज्वेलर्स या दुकानात सायंकाळी ४.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने दुकानातील गॅस टाकीला आग लागली व ती आग दुकानात पसरली.
आग लागतात दुकानमालक नईम नायकवडी दुकान बाहेर आले.त्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलवले.सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ मुजावर, काकासाहेब पाटील,घरमालक श्री.भोसले शेजारी अनंत काडाप्पा,जैनुल नायकवडे आदींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.आग विझवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेची अग्निशामक गाडी तसेच पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला
मात्र आगीने भडका घेतल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आगीमुळे संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले.तसेच सोन्या व चांदीच्या दागिन्यांचे नुकसान झाले.दुकानाचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दुकानमालक श्री.नायकवडी यांनी सांगितले.घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल झाले.त्यांनी पाहणी केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली