KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे
जय हनुमान मित्र मंडळांच्या वतीने मिणचे सह परिसरामध्ये प्रथमच श्रीगणरायाची महाआरती.....
जय हनुमान मित्र मंडळ दर्गा चौक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीसाठी गणेश भक्तांची उपस्थिती लक्षणीय
मिणचे ता.हातकणंगले येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीसाठी गावातील सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा प्रकारची महाआरती मिणचे गावासह परिसरामध्ये जय हनुमान मित्र मंडळाने पहिल्यांदाच दर्गा चौक येथे आयोजित केल्याने गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.यावेळी जय हनुमान मित्र मंडळाने महाआरती साठी उपस्थित सर्व भक्त भाविक यांना प्रसादाचे वाटप केले.
यावर्षी जय हनुमान मित्र मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा केला. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सत्कार, देश सेवेसाठी सीमेवर लढा देणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार यांसारखे सामाजिक उपक्रम राबविले गेले.गेली नऊ दिवस विविध सामाजिक,राजकिय,शैक्षिणक, क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाऱ्या व गावातील तसेच मंडळातील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते श्रीगणेशाची आरती व पूजा करण्यात आली. जय हनुमान मंडळाने केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे गावातील तसेच परिसरातील सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.
या महाआरती साठी तसेच गेली नऊ दिवस श्री गणेशाच्या आरती व पुजेसाठी पुजारी संजय गुरव यांनी मंडळाला सहकार्य केले.तसेच गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक,जय हनुमान मित्र मंडळाचे जुने जाणते कार्यकर्ते संतोष भोसले सलिम जमादार नितीन वाडकर अभिजीत हंकारे नईम मोमीन झाकीर जमादार चंद्रकांत पाटील अझर मोमीन सुनिल पाटील जगदीश भोसले प्रकाश नेर्लेकर सतीश पाटील राजू नेर्लेकर शिवाजी भोसले संजय भोसले सुनिल नेर्लेकर कृष्णात भोसले रामचंद्र नेर्लेकर सुरेश भोसले सलिम मोमीन सर, सुनिल भोसले बाळासो भोसले यांच्यसह मंडळाचे अध्यक्ष अमर भोसले उपाध्यक्ष विशाल भोसले नितीन भोसले रणजित बचाटे वसीम मोमीन अमोल भोसले यांच्यसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात श्री गणेश विसर्जन करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली