KOLHAPUR ; एकात्मिक बालविकास सेवा योजना हातकणंगले प्रकल्प अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री ठेव पावती वितरण कार्यक्रम संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR ; एकात्मिक बालविकास सेवा योजना हातकणंगले प्रकल्प अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री ठेव पावती वितरण कार्यक्रम संपन्न



KOLHAPUR
वार्ताहर विनोद शिंगे

एकात्मिक बालविकास सेवा योजना हातकणंगले प्रकल्प अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री ठेव पावती वितरण कार्यक्रम
संपन्न



  १ ऑगस्ट २०१७ च्या शासननिर्णयानुरूप हातकणंगले
प्रकल्पातून १ मुलीवर किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली असेल तर अशा पालकांना "माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळतो. 



त्याअंतर्गत हातकणंगले तालुक्यामधील दोन प्रकल्पात एकूण १८ लाभार्थ्याची निवड करण्यात आली आहे. त्या पात्र लाभार्थ्यांना आमदार  राजू बाबा आवळे,हातकणगले गटविकास अधिकारी,डाँ शबाना मोकाशी, बालविकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे मा मुख्याध्यापक गोमटेश बेडगे ( एम. जी. शहा विद्यामंदिर) ग्रामसेवक चद्रंकात गळवी यांचे हस्ते वाटप" माझी कन्या माझ्या " योजनेअंतर्गत पावती वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी  पालक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या 



       प्रांजल विजय चव्हाण सावर्डे -, स्वानंदी अमित मगदूम -खोची, राधिका सदाशिव दृटी खोतवाडी, रियाशी विकास मोरे - कोरोची यांना ठेव पावती वितरण करण्यात आले

सदर कार्यक्रमाचे नियोजन प्र.ना.वि.प्र. हातकणंगले  प्रकलपाच्या पर्यवेशिका यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कुमार,आभार साक्षी मोरे यांनी मानले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_____________________________________________________________

या बातमीचे प्रायोजक आहेत...
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड,सांगली.

             www.nisargbhumi.com



_____________________________________________________________