KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधि नियाज जमादार कोल्हापुर
करवीर संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचे स्मारक व ऐतिहासिक दालन कोल्हापूरमध्ये व्हावे-
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान अंतर्गत ताराराणी ब्रिगेड
करवीर संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचा इतिहास अवघ्या जगाला प्रेरणा देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून हातात तलवार घेऊन स्वराज्याची धुरा सांभाळली. सर्वात जास्त काळ औरंगजेबाला झुंज देत अनेक महत्वपूर्ण किल्ले परत मिळवले. करवीर संस्थानची स्थापना करून कोल्हापूरला ऐतिहासिक,भौगोलिक व सांस्कृतिक वारसा घालून दिला.पर्यटन स्थळ म्हणून जगातील अनेक पर्यटक कोल्हापूरला भेट देत असतात.छत्रपती ताराराणींच्या कार्यकाळात पन्हाळा गडाला राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले.
कोल्हापूर ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती ताराराणींच्या पराक्रमी राजस्त्रीचा इतिहास पुढे यावा पर्यटनदृष्ट्या कोल्हापूरचा लौकिक वाढावा व पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा या हेतूने महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानने राज्याचे मुख्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खासदार व दहा आमदारांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असणाऱ्या शाहू मिलमध्ये विस्तारित जागेवर ज्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक आणि ऐतिहासिक वास्तू व इतर माहितीसाठींचे भव्य दालन होत आहे त्याच धरतीवर छत्रपती ताराराणींच्या ऐतिहासिक स्मारक आणि दालनाच्या बाबतीत तातडीने निर्णय घेण्यात यावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल अशी मागणी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान अंतर्गत ताराराणी ब्रिगेड ने केली आहे.
या पत्रकार परिषदेत समीर काळे,शाहिन धारवाडकर,डॉ रेखा जांभळे,स्वाती काळे,उत्पत मुल्ला, अश्विनी हुल्ले,अश्विनी जाधव,वर्षा पाटील, सारिका सुर्यवंशी, ज्योती सावंत,अनिता माने व दिशा पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली