KOLHAPUR: इचलकरंजी येथे भरपावसात गणेश भक्तांनी 'श्री'ची मिरवणूक काढली.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: इचलकरंजी येथे भरपावसात गणेश भक्तांनी 'श्री'ची मिरवणूक काढली.




KOLHAPUR: 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

इचलकरंजी येथे भरपावसात गणेश भक्तांनी 'श्री'ची मिरवणूक काढली....

इचलकरंजीसह परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाने जवळपास दोन तास झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, जोरदार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांनी गणेश आगमन मिरवणूक पावसातून काढल्या.




गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळनंतर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती; मात्र बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला होता.

गणेश चतुर्थी असल्यामुळे गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. दुपारपर्यंत घरोघरी बाप्पा विराजमान झाले. सायंकाळनंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसह बाजतगाजत बाप्पांच्या आगमनाचे नियोजन केले होते.


मात्र संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे मिरवणुका काही काळ खोळंबल्या, तर काहीजणांनी पावसातच गणेश भक्तांनी 'श्री'ची मिरवणूक काढली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली