DELHI ; कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; दिल्लीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास..!

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

DELHI ; कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; दिल्लीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास..!



DELHI :
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; दिल्लीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास..!


प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले.


गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या नियमित दिनचर्येनुसार, ते सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले.


गेल्या आठ दिवसांपासून ते बेशुद्धावस्थेत होते. तसेच त्यांच्या हृदयातही १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

२५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात त्यांचा जन्म झाला. राजू श्रीवास्तव यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना बलाई काका म्हणत. राजू सुरवातीपासून नक्कल फार उत्तम करत असल्याने त्यांना कॉमेडियनच व्हायचे होते. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.


अशा या कलाकाराला लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून भावपूर्ण श्रद्धांजली...


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली