(५ सप्टेंबर) आजचा दिवस पूजनीय गुरूंना वंदन करण्याचा....
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे पहिल्यांदा उप राष्ट्रपती व नंतर १९६२ ते १९६७ राष्ट्रपती म्हणून त्यांची कारकीर्द राहिली, त्या पूर्वी त्यांनी ४० वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते.
भारत सरकारने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी १९५४ साली भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.१९६२ साली ते राष्ट्रपती झाल्यावर त्यांचे काही शिष्य त्यांना भेटले व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन याना त्यांनी विनंती केली की त्यांचा जन्म दिन साजरा करायला परवानगी द्या तेंव्हा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला त्यांनी परवानगी दिली
आणि तो दिवस शिक्षकांच्या प्रति आदर दाखवण्यासाठी भारतभर साजरा केला जातो.पुराणकाळापासून गुरुपौर्णिमेला वंदन करण्याची परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहेच.
प्रत्येकाच्या जीवनात गुरूच महत्व अनन्य साधारण असते. पहिली गुरु ही माता असते आणि नंतर शिक्षण पूर्ण होईपर्यंत वेगवेगळे गुरुजन आपल्याला बोटाला धरून शिक्षित करत असतात आणि त्यांनी दिलेल्या या शिदोरीवर आपण सारेजण पुढचे आयुष्य व्यतीत करतो. या निमित्ताने शिष्याच्या आयुष्यातले गुरुचे स्थान कोणते असते ते सांगणारी एक गोष्ट आठवली .
शांतिनिकेतन च्या रम्य परिसरात हुगळी नदीच्या काठी अध्ययन सुरु असताना एकाने रवींद्रनाथ टागोगारांना प्रश्न विचारला की शिष्यासाठी गुरुचे स्थान कोणते असते. त्यांनी नदीतून चाललेली छोटी होडी दाखवली आणि त्याला विचारले,होडी कलकत्याला पोचायला किती वेळ लागेल, त्याने उत्तर दिले साधारण २ ते ३ तास लागेतील आणि तो पर्यंत वल्व्हवून नावाडी दमून जाईल.तिथून दुसरी स्टीम बोट जात असते, तिकडे बोट करून त्यांनी विचारले ही होडी या बोटीला बांधली तर किती वेळ लागेल तो म्हणतो जेमतेम अर्धा तास लागेल आणि नावाडी दमणार नाही.. त्यावर गुरुदेव म्हणाले त्या आगबोटी सारखे गुरुचे बोट पकडले तर न चाचपडता इप्सित साध्य करता येईल हेच गुरुचे शिष्याच्या जीवनात स्थान असते.
गुरु प्रार्थना
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ,
गुरुर देवो महेश्वरः ,
गुरुर साक्षात परम ब्रह्म ,
तस्मै श्री गुरुवे नमः🙏🏼
_________________________________________________
आमच्या जीवनातील सर्व शिक्षकांना ज्यांच्यामुळे आम्ही घडलो अशा सर्व गुरुवर्यणा आमचा मानपासूनचा प्रणाम ...
संपादक ,
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.