WARDHA
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
वर्धेचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी मावळत्या जिल्हाधिकारी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे २०१५ तुकडीचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. रुजू होण्यापूर्वी ते एमएमआरडीए मुंबई येथे सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर अमरावती जिल्ह्यांतील धारणी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली जिल्ह्यांत १ वर्षाचा कालावधीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी गोर,गरीब आणि शेतकऱ्यांच्या कामाला आदीं प्रधान्य दिले होते.
वर्धा जिल्ह्यांत त्या प्रथमच महिला जिल्हाधिकारी असल्यांने जिल्ह्यांत महिलांचे बचत गट देखील मजबूत करण्यासांठी त्यांनी विशेष काम केले. जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींच्या दबावांला बळी न पडता त्यांनी काम केले. नियमानुसार त्यांनी कामाला प्रधान्य दिले त्यामुळे जिल्ह्यांत त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. कठोर, कार्यशैली आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख वर्धा जिल्ह्यांमध्ये चांगलीच निर्माण झाली होती. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी म्हण त्यांनी पदभार स्वीकारतात बंद केली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा २४ तास वचक होता.
महिन्याभरापूर्वी हिंगणघाट तालुक्यांत असलेल्या पूरग्रस्ताबाबत त्यांनी स्वता:आढावा घेण्यासाठी देशभ्रतार पूरग्रस्त भागात गेल्या होत्या. तसेच त्यांची कोरोना काळातही त्यांनी जिल्हा प्रशासनांला हाताशी घेवुन कोरोनांचा मुकाबला केला होता. मात्र त्यांच्या अचानक बदलीमुळे सध्या वर्धा जिल्ह्यांमध्ये नाराजगीचा सूर दिसून येत आहे. तर वर्धा जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे वर्धा जिल्ह्यांतील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडूंन नुतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे भव्य स्वागत करण्यांत आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली