SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी
श्री. क्षेत्र शिंगणापूरच्या
ग्रामपंचायतकडुंन गोसावी दफनभूमीतील समाद्या उध्वस्त केल्यांचा प्रकार.
सातारा जिल्हा गोसावी समाजांतील अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल.
दहिवडी ता. माण तालुक्यांतील शिंगणापूर येथील दशनाम गोसावी समाजाच्या दफन भूमीतील काही गोसावी समाजाच्या समाध्यांचे जेसीबीच्या साह्यांने उध्वस्त केल्यांचा प्रकार मागील चार दिवसांपूर्वी शिंगणापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या गलथान मनमानी कारभारांमुळे घडून आला. समाधी घटनास्थळी शिंगणापूरच्या ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच, तलाठी ग्रामसेवक विनापरवाना तेथील रहिवासी गोसावी समाजांतील कुटुंबातील कोणत्याही सदस्यांला ग्रामपंचायत व सरपंच यांनीही कल्पना न देता जेसीबीच्या साह्यांने खोदकाम चालू केले होते.
सदरची माहिती तेथील रहिवासी असणाऱ्या किशोर गिरी गोसावी यांनी गोसावी समाजातील सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांना याबाबतची कल्पना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता.पुणे सातारा जिल्ह्यांतील अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य घटनास्थळी दाखल होऊन शिंगणापूरच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या मनमानी कारभारांला विरोध केला.
सदर शिंगणापूर,दहिवडी समाजातील गोसावी बांधव कार्यकर्ते यांच्या उपस्थितीसह पुणे जिल्हा सातारा जिल्ह्यांतील अध्यक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थिंतीत दहिवडी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
सदर घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर घटनास्थळी भेट दिली. मात्र गोसावी समाज एवढ्यावरच न थांबता शिंगणापूरच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या गलथान कारभारांमुळे समाजांतील लोकसंदेश न्यूजचे पत्रकार संभाजी गोसावी यांना या घटनेची कल्पना देण्यांत आली त्यांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत. गोसावी यांनी दहिवडीचे तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह प्रशांत आवटे (महसूल अधिकारी सातारा ) यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत त्वरित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
सातारा जिल्ह्यातील गोसावी समाजातील अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य कमिटी श्री. क्षेत्र. शिंगणापूर येथील गोसावी मठात घडलेल्या घटनेची पाहणी केली सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी, श्रीकांत भारती (खजिनदार) सौ. सुजाता गिरी गोसावी (माजी नगराध्यक्ष सातारा) सौ.मिना गिरीगोसावी (सदस्य) शहाजी गिरी गोसावी (निवृत्त कॅप्टन) उमेश गिरी (सदस्य) राजेंद्र गिरी (उपाध्यक्ष) संभाजी पुरीगोसावी (संपर्क प्रमुख) आदीं गोसावी समाज बांधवांनी श्री. क्षेत्र शिंगणापूर येथील घडलेल्या शिंगणापूरच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या गलतन कारभारांच्या मनमानी कारभारांबाबत घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षांत घेता सातारा जिल्हा गोसावी समाजांतील अध्यक्ष पदाधिकारी संपूर्ण टीमकडुंन निषेध व्यकत करण्यात आला
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.