SATARA : सातारा तहसीलदारपदी राजेश जाधव यांची नियुक्ती. तर आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : सातारा तहसीलदारपदी राजेश जाधव यांची नियुक्ती. तर आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली.



SATARA : 
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी

सातारा तहसीलदारपदी राजेश जाधव यांची नियुक्ती. तर आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली.

सातारा. कास पठारावरील अतिक्रमांना नोटीस बजवणाऱ्या सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयांत निवडणूक शाखा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा पुरवठा शाखेचे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश जाधव यांना पदभार देण्यांत आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महसूल प्रशासनांतील तहसीलदार पदांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. सातारा महसूल विभागातील बदल्यांचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविला आहे. यामध्ये काही दिवसापूर्वी कास पठारावरील अतिक्रमांना नोटीस बजवून ती अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांची मुदत देणाऱ्या सातारच्या तडफदार तहसीलदार आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली झाली असून तत्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्यांचे आदेशही देण्यांत आले आहे

तत्कालीन तहसीलदारांनी लोकप्रसाद चव्हाण यांच्या बदली झाल्यानंतर २२ फेब्रुवारी २०१९ मध्ये आशा होळकर यांनी सातारा तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सातारा तालुक्यातील वाळू चोरीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी कणखर भूमिका घेतली होती अनेक बेकायदेशीर उल्खननांला त्यांनी चांगला चाप लावला होता. गत सप्ताहांत कास पठारावरील १२९ बांधकामांना बांधकाम का पाडण्यांत येऊ नये, अशा नोटीसा पाठवून एकच खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची कोल्हापूरला बदली झाल्यांने पुन्हा उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. 

 मात्र या नियमित बदल्या असल्यांचे महसूल विभागाकडूंन सांगण्यांत आले आहे. दरम्यान जिल्हा पुरवठा शाखेच्या राजेश सदाशिव जाधव यांची साताऱ्यांचे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाल्यांतर 


 लोकसंदेश न्यूज चॅनेल सातारा प्रतिनिधी संभाजी गोसावी यांनी त्यांच पुष्गुच्छ देवून स्वागत केले
महसूल विभागांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अभिनंदन केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली