SATARA: अवैध दारु वाहतुक करणाऱ्याच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या. या कारवाईमध्ये 1,24,280/- किमतीचा मुद्देमाल जप्त.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA: अवैध दारु वाहतुक करणाऱ्याच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या. या कारवाईमध्ये 1,24,280/- किमतीचा मुद्देमाल जप्त.



SATARA
लोकसंदेश सातारा प्रतिनिधी संभाजी गोसावी

अवैध दारु वाहतुक करणाऱ्याच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या. या कारवाईमध्ये 1,24,280/- किमतीचा मुद्देमाल जप्त. 

   सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये      शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुंन जप्त.
मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन जिल्ह्यांमध्ये सध्या अवैध दारु धंदे व अवैध शस्त्रे यांचेविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत जिल्हयांतील सर्व पोलीस ठाणेंना आदेश दिले असुन त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यांतील मा.सहा.पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.

आज दि.16/08/2022 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे सपोनि श्री.प्रशांत बधे यांना कोटेश्वर चौक ते शाहुपूरी चौक दरम्यांन एक लाल रंगाची अल्टो कारमधुन अवैध दारुची वाहतुक होणार असल्यांची माहिती मिळाली होती. त्याअनुशंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकांस कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. सदर माहितीचे अनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने गेंडामाळ नाका येथे सापळा लावला. सदरचे पथक दबा धरुन बसले असताना 12.20 वा.चे सुमारांस एक लाल रंगाची अल्टो कार येताना दिसली. पोलीसांनी सदर कार थांबविण्यांचा प्रयत्न केला असता अल्टो कार चालकांने वाहन न थांबवता तसाच पळुन जावु लागला,म्हणुन गुन्हे पथकांने सदर कारचा पाठलाग करुन सदरची कार घेराव घालुन पकडली. त्यावेळी कारची पाहणी केली असता त्यामध्ये देशी विदेशीचे बॉक्स व बाटल्या आढळुन आल्या. पोलीसांनी कारचालकाकडे विचारपुस करुन खातरजमा केली असता तो आर्थिक फायद्यासांठी बेकायदेशिर अवैध दारुची वाहतुक करत असल्यांचे निष्पन्न झाले. पोलीसांनी कार ताब्यांत घेत कारमधील इसमाकडुंन एकुण 1,24,280/- रुपये किंमतीचा अवैध दारुचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर बाबत पोलीस नाईक स्वप्निल कुंभार यांनी सरकारतर्फे फिर्याद देवुन कारचालक ( सनी विकास कासुर्डी  रा. देशमुख नगर मेढा ता.जावळी जि सातारा) असे या ताब्यांत घेण्यांत आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला. आहे.सदर गुन्हयांचा तपास मपोहेकॉ. माधुरी शिंदे ह्या करीत आहेत.
अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध सापळा लावुन अवैध दारु वाहतुकीवर धडक कारवाई करत एकुण 1,24,280/- रुपये किंमतीचा अवैध दारुची मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्संल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.अजित बो-हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत बधे,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी,लैलेश फडतरे पो.ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सावंत, सचिन पवार आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली